Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Microsoft ची मोठी घोषणा! जगातील सर्व रिटेल स्टोर्स कायमचे होणार बंद!

Microsoft ची मोठी घोषणा! जगातील सर्व रिटेल स्टोर्स कायमचे होणार बंद!

ग्राहकांना मिळणार ऑनलाइन सेवा 

Related Story

- Advertisement -

अमेरिकेसह जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व स्टोअर्स बंद होणार आहेत. आता कंपनी डिजिटल स्टोअरवर लक्ष देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, Microsoft.com, Xbox आणि Windows च्या महिन्याच्या एक्टिव यूजर्सची संख्या १९० बाजारपेठांमधून १.२ अब्ज आहे. परंतु कंपनीने इंग्रजी टेक न्यूज वेबसाइट ‘द वर्ज’ यांना सांगितले की, ते सध्या कोणत्याही प्रकारची कर्मचारी कपात करणार नाही.

ग्राहकांना मिळणार ऑनलाइन सेवा 

तसेच मायक्रोसॉफ्टने आपले स्टोअर कायमचे बंद होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, तसेच किरकोळ स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या सेवा ग्राहकांना ऑनलाइन दिल्या जातील हे निश्चितपणे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्याची ऑनलाईन विक्री सातत्याने वाढत आहे त्यामुळे आम्ही किरकोळ स्टोअरच्या तुलनेत ग्राहकांना ऑनलाइन चांगली सेवा देत आहोत.

सेवा देण्यासाठी १२० भाषा ज्ञात असणारी टीम

- Advertisement -

माइक्रोसॉफ्ट कंपनीने सांगितले की, ‘आम्ही एक टीम तयार केली आहे ज्यात मल्टीटॅलेंड लोकं आहेत जे जगातील कोपऱ्यातून काम करू शकतात. आमचा टीम कोणत्याही परिस्थितीत सर्व प्रकारच्या ग्राहकांना मदत करण्यास तयार आहे. आमच्या टीममध्ये असे लोक आहेत ज्यांना १२० पेक्षा जास्त भाषा माहित आहे, यामुळे कोणत्याही ग्राहकांची समस्या समजून त्या ग्राहकांनी सेवा पुरवली जाईल. आमची टीम पुर्वीसारखीच उत्तम आहे. ‘


Google भारतातील लघु उद्योग व्यावसायिकांना देणार कर्ज

मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर कंपनीने आपली स्टोअर्स बंद केले होते. यावेळी, मायक्रोसॉफ्टच्या टीमने छोट्या व्यापारी आणि एज्युकेशनच्या ग्राहकांना मदत केली.यासाठी हजारो लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आणि कॉलद्वारे लोकांना मदत केली गेली. तसेच मायक्रोसॉफ्टच्या टीमने १४ हजार ऑनलाइन कार्यशाळा, शिबिरे आणि ३ हजार व्हर्च्युअल पदवीधर वर्ग आयोजित केले आहेत.

- Advertisement -