घरदेश-विदेशगोव्यात मिग-२९के विमान कोसळले; दोन्ही पायलट सुखरूप

गोव्यात मिग-२९के विमान कोसळले; दोन्ही पायलट सुखरूप

Subscribe

आज गोव्यात भारतीय नौदलाचे मिग-२९के हे लढाऊ विमान कोसळले. प्रशिक्षणाच्या मोहिमेसाठी उड्डान घेताच अवघ्या काही सेकंदातच ही दुर्घटना घडली. या मिग-२९के मध्ये दोन वैमानिक होते. यामध्ये एक अनुभवी आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. या दोघांनीही ऐनवेळी विमानातून इजेक्ट केल्याने ते सुखरूप बचावले आहेत. हे विमान खास प्रशिक्षणासाठी बनवण्यात आले होते.

- Advertisement -

खास ट्रेनिंगसाठी बनवलेले विमान मिग-२९ के दाबोळी येथील आयएनएस हंसावरून निघाले होते. प्रशिक्षणासाठी निघालेल्या या विमानामध्ये कॅफ्टन एम.शेवखांड आणि लेफ्टनंट कॅडर दीपक यादव होते. मिग २९ के उड्डाण गेताच विमानातील इंजिनमध्ये आग लागली. आणि क्षणार्धात ही आग पसरली. लगेचच दोन्ही वैमानिकांनी इमरजन्सी एक्झिट केली. यात वैमानिक किरकोळ जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -