Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी VIDEO - चित्रपटगृहाचा आनंद घेण्यासाठी पठ्ठ्यानी केला जुगाड

VIDEO – चित्रपटगृहाचा आनंद घेण्यासाठी पठ्ठ्यानी केला जुगाड

सध्या चित्रपटगृहे बंद असल्यामुळे एका पठ्ठ्यानी चक्क घरातच चित्रपटगृह तयार केले आहे.

Related Story

- Advertisement -

जगभर पसरणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशात चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, चित्रपटप्रेमी तरी किती काळ चित्रपटगृहापासून दूर राहणार? कारण चित्रपट पाहण्याचा खरा आनंद घरात नाही तर चित्रपटगृहामध्ये असतो. पण, सध्या चित्रपटगृहे बंद असल्यामुळे एका पठ्ठ्यानी चक्क घरातच चित्रपटगृह तयार केले आहे. डायरेक्टर टॉम किंग्सले, असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी तयार केलेल्या चित्रपटगृहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्पेशल लॉकडाऊन चित्रपटगृह

- Advertisement -

टॉम किंग्सलेने शेअर केलेल्या व्हिडिओत चित्रपटगृह दिसून येत आहे. मात्र, हे चित्रपटगृह वेस्ट कार्डबोर्डपासून तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे कार्डबोर्ड लॅपटॉपकरता तयार केले आहे. चित्रपटगृहाचा घरात आनंद घेता यावा याकरता त्यांनी स्पेशल, असं लॉकडाऊन चित्रपटगृह तयार केले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १३ लाख ७७ हजार लोकांनी पाहिला आहे. तर अनेक लोकांनी या पठ्ठ्याने केलेल्या जुगाडाचे कौतुक केले आहे. किंग्सलेने म्हटले आहे की, ‘यातून मोठ्या स्क्रिनचा आनंद तर घेता येत नाही. पण, चित्रपटगृहाच्या आठवणी नक्कीच ताजा करता येतात’.

असे तयार केले चित्रपटगृह

- Advertisement -

टॉमने सांगितले आहे की, ‘एक वेस्ट कार्डबोर्ड, लाल-काळ्या रंगाचे कार्ड आणि काही वॉटर कलरचा वापर करुन हे चित्रपटगृह तयार करण्यात आले आहे. दरम्यान, या चित्रपटगृहात मांजरीची एन्ट्री होताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेक जण तिचेही चाहते झाले असून चित्रपटगृह कसे बनवले?, अशी अनेकांकडून विचारणा केली जात आहे.


हेही वाचा – इंटरकास्ट लग्न करताय! मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची


 

- Advertisement -