घरदेश-विदेशसुपर कॉम्प्युटरची कोडिंग आता संस्कृत भाषेत

सुपर कॉम्प्युटरची कोडिंग आता संस्कृत भाषेत

Subscribe

आता संस्कृतमध्ये भविष्यात सुपर कॉम्प्युटर कोडिंग असणार असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी दिली आहे. बुधवारी कलकत्ता चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे कौशल्य विकास या विषयावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

संस्कृत ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे. या भाषेपासूनच हिंदी, मराठी, सिंधी, पंजाबी सारख्या अनेक भाषाचा उगम झाला आहे. भारताच्या संस्कृतीचा मुख्य गाभा म्हणून संस्कृत भाषेकडे पाहिले जाते. आता संस्कृतमध्ये भविष्यात सुपर कॉम्प्युटर कोडिंग असणार असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी दिली आहे. बुधवारी कलकत्ता चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे कौशल्य विकास या विषयावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

युरोपीय देशांमध्ये संस्कृतचं शिक्षण दिलं जातं

हेगडे सांगतात कि, ‘आपल्या देशात इंग्रजी भाषेकडे लोकांचा कल झुकतोय. परंतु, जगातील मोठमोठे वैज्ञानिक संस्कृत भाषेकडे वळत आहेत. कॉम्प्युटरच्या कोडिंगसाठी संस्कृत भाषा ही उत्तम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही भाषा सुपर कॉम्प्युटरसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळेच युरोपीय देशांमध्ये संस्कृतचं शिक्षण दिलं जातंय’. कौशल्य विकास कार्यक्रमांचे संदर्भ देत असताना हेगडे यांनी सांगितले की, केंद्र शासनाने सनदी अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणेच कौशल्य विकास सुविधा दिल्या जातील. ”नॅशनल स्कील डेव्हलपमेंट फ्रेमवर्क’च्या अंतर्गत, आम्ही भारतीय कौशल्य विकास सेवा सुरू केली आहे, जी भारताची एक उच्चस्तरीय संस्था असेल’, असेही हेगडे म्हणाले.

- Advertisement -

चार भिंतीच्या पलिकडचे शिक्षण

हेगडे यांनी सांगितले की, ‘कौशल्य विकासाशी संबंधित प्रस्ताव राज्य केंद्रापुढे सादर करु शकतात. यापुढे जाऊन हेगडे सांगतात की, ‘देशातील विद्यार्थ्यांना फक्त शालेय वर्गातलेच शिक्षण दिले जाऊ नये. तर शालेय भिंतींच्या पलीकडील जगाचे ज्ञान त्यांना दिले जावे, असा आमचा उद्देश आहे’.

२ कोटी लोकांना रोजगार देऊ

हेगडे यांच्या म्हणण्यानुसार आजच्या अभियांत्रिकी शिक्षणातून हवे तसे कौशल्यपूर्ण उमेदवार बनू शकत नाहीत. आता बी.टेक, एम.टेक आणि सिव्हिल इंजिनिअर्सची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते सांगतात की, ‘आता हीच मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. भविष्यात दोन कोटी उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर भविष्यात ७६ टक्के लोक वर्तमान नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागले असतील’.

- Advertisement -

हेगडे यांनी सांगितले की, ‘देशाने १८ आंतरराष्ट्रीय कौशिल्य विकास केंद्राची स्थापना केली असून यामध्ये जपान, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या १८ देशांच्या अग्रगण्य कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे. अशाच एका केंद्राची स्थापना कोलकातामध्ये होणार आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -