घरदेश-विदेशई-पासपोर्ट होणार लवकरच जारी; परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

ई-पासपोर्ट होणार लवकरच जारी; परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

Subscribe

नागरिकांना इलेक्ट्रॉनिक चिप असलेला पासपोर्ट लवकरच जारी करण्यासाठी ‘इंडिया सिक्युरिटी प्रेससोबत (ISP)’ चर्चा सुरू

अद्यावत सुरक्षा प्रणाली अर्थात इलेक्ट्रॉनिक चिप असणारा ई-पासपोर्ट लवकरच जारी होणार असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या पहिल्याच संबोधनात यासंदर्भातील घोषणा केली आहे. सातव्या पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त बोलताना केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी असे सांगितले की, नागरिकांना इलेक्ट्रॉनिक चिप असलेला पासपोर्ट लवकरच जारी करण्यासाठी ‘इंडिया सिक्युरिटी प्रेससोबत (ISP)’ चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

तसेच, राज्यस्तरावर आणि वैयक्तिकपणे पासपोर्ट सुविधेसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा परराष्ट्रमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी जयशंकर बोलत होते. यावेळी, सर्व नागरिकांसाठी लवकरात लवकर ई-पासपोर्ट आणि अद्ययावत सुरक्षा प्रणालीसह पासपोर्ट बुकलेट जारी केले जावे याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत, असे देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

९३ पासपोर्ट सेवा केंद्रात काम सुरू

सर्व लोकसभा क्षेत्रात एक पासपोर्ट सेवा केंद्र बनविण्याच्या योजनेवर काम सुरू असून सद्यस्थितीत देशात एकूण ५०५ पासपोर्ट सेवा केंद्र कार्यरत आहे. त्यातील ९३ पासपोर्ट सेवा केंद्रात याबाबत काम सुरू झाले आहे, अशी माहिती जयशंकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

असा असेल ई-पासपोर्ट 

अद्ययावत सुरक्षा प्रणाली असलेल्या ई-पासपोर्टवर अर्जदाराची डिजीटल स्वाक्षरी असणार असून ती चिपमध्ये सेव्ह केली जाईल. जर कोणत्याही व्यक्तीने या चिपसोबत कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीचे पासपोर्ट निष्क्रीय होईल. याशिवाय चिपमध्ये सेव्ह केलेली माहिती फिजिकल उपस्थित असल्याशिवाय हा पासपोर्टशिवाय वाचता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -