घरदेश-विदेशअजमेरमध्ये तरुणीवर बलात्कार; पोलिस म्हणे भूतबाधा झाली!

अजमेरमध्ये तरुणीवर बलात्कार; पोलिस म्हणे भूतबाधा झाली!

Subscribe

पोलिसांनी पीडित मुलीचे सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहिले नाही तसंच तिची वैद्यकिय तपासणी देखील केली नाही. तरी रिपोर्टमध्ये मुलीला भूताने पछाडल्याचे म्हटले आहे.

राजस्थानच्या अजमेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जी माहिती सर्वांना दिली ती धक्का देणारी आहे. पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पीडित मुलीला भूतबाधा झाली आहे. अजमेरमधील एका संस्थेवे पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

पीडितेचा जबरदस्ती केला गर्भपात

ही घटना कृष्णगडमध्ये घडली आहे. अल्पवयीन मुलीचे असे म्हणणे आहे की, तिला एक भोंदूबाबा घेऊन गेला होता. त्याठिकाणी भोंदूबाबाने माझ्यावर बलात्कार केला मी गर्भवती राहिली तर भोंदूबाबाला वाचवण्यासाठी माझ्या कुटुंबियांनी माझा गर्भपात केला. याप्रकरणी कोर्टामध्ये धाव घेतलेल्या संस्थेच्या राकेश शर्माने सांगितले आहे की, पीडित मुलीची सोनोग्राफी केली असता तिचा गर्भपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गर्भपात करण्याआधी डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले होत की, मुलीचा जीव धोक्यात आहे. मात्र तिच्या कुटुंबियांनी जबरदस्ती तिचा गर्भपात केला.

- Advertisement -

मुलीला भूतबाधा झाली

राकेश शर्माने याप्रकरणी जिल्हा कायदेशीर प्राधिकरणाकडे तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी एसपींना तपास करण्याचे आदेश देण्यात आले आणि पीडित मुलीला सुरक्षा देण्याचे सांगण्यात आले. अजमेरच्या एसपींनी याप्रकरणाचा तपास एसएचओ गगेल सुमन यांना दिला. एसएसओने याप्रकरणाचा तपास करुन रिपोर्ट दिला. या रिपोर्टमध्ये पोलिसांनि सांगितले की, पीडित मुलीला भूतबाधा झाली आहे. त्यामुळे ती शाळेत जात नाही. तसंच मुलगी गर्भवती नाही.

तपास न करता दिला रिपोर्ट

पोलिसांच्या रिपोर्टवर राकेश यांनी सांगितले की, आश्चर्य वाटते की, पोलीस अशा प्रकारची अंधविश्वासाची गोष्ट करत आहेत. त्यांनी पोलिसांवर असा देखील आरोप केला आहे की, पोलिसांनी पीडित मुलीचे सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहिले नाही तसंच तिची वैद्यकिय तपासणी देखील केली नाही. तापस अधिकाऱ्याने या आरोपाला फेटाळून लावत सांगितले की, त्यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांची चौकशी केली होती. त्याआधारेच त्यांनी रिपोर्ट तयार केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -