घरदेश-विदेशसंतापजनक! अल्पवयीन तरूणीला जंगलात नेऊन ७ जणांनी केला बलात्कार आणि...

संतापजनक! अल्पवयीन तरूणीला जंगलात नेऊन ७ जणांनी केला बलात्कार आणि…

Subscribe

घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही आरोपींनी तरूणीला दिली असल्याने ती गप्पच होती

उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले असून अद्याप त्या घटनेचा रोष देशात आहे. मात्र हा प्रकार घडल्यानंतरही अनेक ठिकाणी अशा घटना वारंवार सुरूच आहे. नुकतीच छत्तीसगढमध्ये सामूहिक बलात्काराची भयंकर घटना घडली आहे. घटनेनंतर पीडितेने आत्महत्या करत जीवन संपवले. तर पीडितेच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. पीडिता नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी गेली असता तिच्यावर जंगलात नेऊन अत्याचार करण्यात आला.

असा घडला प्रकार

पीडिता नातेवाईकांच्या घरी असलेल्या लग्नासाठी शेजारच्या गावात गेली होती. यावेळी तिला काही जणांनी थेट या अल्पवयीन मुलीला जंगलात नेले. त्याठिकाणी काही आरोपी जमले आणि ७ जणांनी मिळून तिच्यावर काही तास अत्याचार केले. त्याचबरोबर घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. या घटनेची माहिती फक्त पीडितेच्या एका मैत्रिणीला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगढमधील कोंडगाव जिल्ह्यात ही घटना घडली. नातेवाईकांकडे लग्न असल्याने अल्पवयीन पीडिता जवळच्या गावात गेली होती. लग्नाला गेल्यानंतर मद्यपान केलेल्या दोघांनी अल्पवयीन मुलीला जबरदस्तीन जंगलात नेले. तिथे आणखी पाच जण आले. सात जणांनी मिळून पीडितेवर काही तास अत्याचार केले. आरोपींनी अत्याचार केल्यानंतर तिला पुन्हा लग्नाच्या ठिकाणी आणून सोडले. मात्र, ती या घटनेने हादरून गेल्याने शांत होती. त्यानंतर ती आपल्या वडिलांना न सांगता घरी परतली. घरी परतल्यानंतर पीडितेने आत्महत्या केली.

ही घटना २० जुलै रोजी घडली. पोलिसांनी या घटनेचा तपास केला. तसेच तिच्या कुटुंबीयांनाही विचारणा केली होती, असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले. दरम्यान, बरेच दिवस लोटल्यानंतर पीडितेच्या मैत्रिणीनं घडलेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. तिच्या सामूहिक बलात्कार झाला होता, अशी माहिती मैत्रिणीनं पीडितेच्या कुटुंबीयांना दिली. हे ऐकून तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. पीडिता अगोदर मरण पावली असल्याने घटनेचा पाठपुरावा करता येईल की, नाही याबद्दल त्यांना माहिती नव्हती. कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केले व पोलिसांपर्यंत पोहोचलेच नाही. दोन महिने उलटल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.


CBI चे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -