घरदेश-विदेशभावानेच केला बहिणीवर बलात्कार, दिल्लीतील धक्कादायक प्रकार

भावानेच केला बहिणीवर बलात्कार, दिल्लीतील धक्कादायक प्रकार

Subscribe

अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. विशेषत: लैंगिक अत्याचाराशी निगडीत घटनेमध्ये अल्पवयीन मुलांचा अधिक सहभाग असल्याचे देखील अनेक घटनांमधून समोर आले आहे.नवी दिल्लीतल्या आदर्श नगर भागात हा प्रकार घडला आहे.

दिल्लीत भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नवी दिल्लीतल्या आदर्श नगर भागात हा प्रकार घडला आहे. ८ वर्षीय चिमुरडीवर हा बलात्कार झाला आहे. संतापजनक बाब अशी की, हा बलात्कार करणारा नराधम आणखी कोणी नसून या मुलीचा सख्खा भाऊ आहे. जो स्वत: अल्पवयीन असल्याचे समजते आहे. या घटनेनंतर आता राहत्या घरातही मुली सुरक्षित नाहीत का? असाच प्रश्न पडला आहे.

पालकांच्या अनुपस्थितीत घडला प्रकार

सोमवारी या मुलांचे पालक बहीण-भावाला घरी ठेवून बाहेर गेले. या वेळात भावाने तिच्यावर बलात्कार केला. आई-वडील घरी उशीरा परतल्यानंतर त्यांना मुलीच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याचे दिसले आणि त्यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात समुपदेशकांनी या मुलीला झालेल्या घटनेबद्दल विचारल्यानंतर या चिमुरडीने झालेला सगळा प्रकार सांगितला.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

सोमवारी नवी दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात या चिमुरडीला दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत होता. तिच्यावर बलात्कार झाल्यामुळे सगळ्यात आधी रुग्णालयाने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले.

मुलीची प्रकृती गंभीर

या मुलीची प्रकृती अजूनही गंभीर असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

अल्पवयीन मुलांकडून लैंगिक छळ

अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. विशेषत: लैंगिक अत्याचाराशी निगडीत घटनेमध्ये अल्पवयीन मुलांचा अधिक सहभाग असल्याचे देखील अनेक घटनांमधून समोर आले आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणात देखील अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. या शिवाय अनेक बलात्कारांच्या घटनांमध्ये हेच समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांची मानसिकता बदलायचे नेमके कारण काय? असा प्रश्न साहजिकच पडतो. कळत्या वयात अनेक गोष्टी या मुलांना कळतात. मोबाईलमध्ये गुरफटलेल्या मुलांना त्यांच्या वाढीच्या वयातील समस्या पालकांना सांगायला वेळ नसतो. त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टींचा अवलंब ही मुले करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -