घरदेश-विदेशयांना शरम कशी वाटत नाही? ६३ वर्षाच्या म्हाताऱ्याचा ४ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

यांना शरम कशी वाटत नाही? ६३ वर्षाच्या म्हाताऱ्याचा ४ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

Subscribe

महिलांच्या सुरक्षेवर हल्ली बरीच चर्चा सुरू आहे. मात्र, देशाचं भविष्य असणाऱ्या चिमुकल्या देखील नराधमांच्या हाती बळी पडताना दिसत असताना देशाचं भवितव्य किती सुरक्षित आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वच प्रशासकांना द्यावं लागणार आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक बातम्या कानांवर पडत असतानाच, एका अवघ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर ६३ वर्षांच्या वृद्ध नराधमाने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घडली आहे. घराजवळच राहणाऱ्या या वृद्धानं मुलीवर बलात्कार केल्यामुळे परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण असून या वृद्धाविषयी संतापाच्या भावना आहेत. कृष्णा चंद्रकार असं या नराधमाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चार वर्षांची चिमुरडी घराबाहेर खेळत असताना कृष्णाची नजर तिच्यावर पडली. आणि त्याने संधी साधत मुलीशी अतिप्रसंग केला. जेव्हा मुलीच्या आईला मुलीच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा आईने मुलीची विचारपूस केली. तेव्हा खूप दुखत असल्याचं मुलीनं सांगितलं. त्यासोबतच या वृद्धानं तिच्यासोबत केलेला प्रकार तिनं इशाऱ्यांनी आपल्या आईला सांगितला.

- Advertisement -

या प्रकारानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध कृष्णा चंद्रकारला अटक केली आहे. या चिमुरडीच्या खासगी भागाला दुखापत झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६ अ(अल्पवयीनावर बलात्कार) आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -