ऑस्टेलियामध्ये भारतीय महिला डॉक्टरचा खून; प्रियकराचीही आत्महत्या

ऑस्टेलियातील सिडनीमध्ये भारतीय वंशाच्या महिलेचा मृतदेह एका सूटकेसमध्ये सापडला आहे.

Mumbai
preeti reddays murder in australia
प्रिती रेड्डेचा अस्ट्रलियात मृत्यू

ऑस्टेलियातील सिडनीमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह एका सूटकेसमध्ये ठेवलेला होता. ही सूटकेस त्याच महिलेच्या गाडीमध्ये अढळली आहे. तसेच या महिलेच्या मृतदेहावर सर्वत्र चाकूच्या खुणा आढळून आल्या आहेत. तपासानंतर सदर महिला, ही भारतीय वंशाची असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचे नाव प्रिती रेड्डी असल्याचे पोलीस तपासात समोर आले. बुधवारी सकाळच्या सुमारास सिडनी पूर्व भागात एका रस्त्याच्या बाजूला ही गाडी पोलिसांना आढळून आली. दरम्यान, सदर महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. प्रिती रेड्डी नामक सदर महिला ही पेशाने डेंटिस्ट होती.

प्रियकराची आत्महत्या

प्रितीच्या खूनाचा तपास सूरु केल्यावर न्यू साउथ पोलिसांनी याप्रकरणी तिचा आधीचा प्रियकर हर्षवर्धन नरडे नामक युवकाची चौकशी केली. या चौकशीच्या काही वेळा नंतर लगेचच हर्षवर्धनचा देखील एका अपघातात मृत्यू झाला असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी ३२ वर्षीय प्रितीचा खून हा तिच्याच आधीच्या प्रियकराने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. हर्षवर्धनच्या अपघाताचा प्राथमिक तपास झाला असून त्याने स्वतः जाणून बुजून आपली गाडी एका ट्रकला धडकवली आणि आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणी हर्षवर्धनने आधी प्रतिचा खून केला, आणि मग स्वतः आत्महत्या केली. असा एकंदर अंदाज पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून व्यक्त केला आहे.

रविवारी मध्यरात्री खून

पोलिसांनी जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, प्रिती एका फुटेजमध्ये रविवारी रात्री अडीचच्या सुमारास मॅकडोनल्डमध्ये दिसून आली. पेशाने डेन्टीस असलेली प्रिती तिच्या क्लासमेटस सोबत एका डेन्टल कॉन्फरन्सला गेली होती. या कॉन्फरन्स नंतर प्रिती आपल्या घरी जाणार होती. रविवारी फोनवरुन आपल्या घराच्यांशी बोलताना तिने कॉन्फरन्स नंतर घरी येणार असल्याचे सांगितले होते. मात्र दुर्देवाने रविवारी तिने घराच्यांशी केलेला संवाद तिचा शेवटचा संवाद ठरला. दरम्यान त्या डेन्टल कॉन्फरन्सला तिचा प्रियकर देखील उपस्थित होता. यानंतर ते दोघही त्या रात्री एकमेकांसोबतच होते. त्याच मध्यरात्रीच्या सुमारास हर्षवर्धनने तिचा चाकूने वार करुन खून केला. मृत्यू नंतरही रागाच्या भरात हर्षवर्धन तिच्यावर चाकूने वार करत राहीला असावा. यानंतर त्याने तिचा मृतदेह तिच्याच गाडीत एका सूटकेसमध्ये भरुन ठेवला, असा घटनाक्रम घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा सविस्तर तपास न्यू साउथ वेल्स पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here