घरदेश-विदेशविद्यार्थ्याचा दृश्यम स्टाईल खून; मृतदेह तळघरात पुरुन वर केले प्लास्टर

विद्यार्थ्याचा दृश्यम स्टाईल खून; मृतदेह तळघरात पुरुन वर केले प्लास्टर

Subscribe

गाझियाबादमध्ये लॉ विद्यार्थी बेपत्ता होता, एका आठवड्यांनतर त्याचा मृतदेह जुन्या घरमालकाच्या तळघरात पूरलेला आढळला.

गाझीयाबादच्या साहिबाबाद येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका लॉ विद्यार्थीचा खून करुन त्याचा मृतदेह तळघरात पुरण्यात आला. त्यानंतर पुरलेल्या जागी सिमेंटचा कोबा करुन ती जागा पुन्हा पुर्वीसारखी करण्यात आली. अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाशी साधर्म दाखवणारी ही घटना घडली आहे. पंकज कुमार भाड्याने राहत असलेल्या घरात त्याचा मृतदेह तलघरात सहा फुट खोल खड्ड्यात पुरून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे साहिबाबद येथे एकच खळबळ उडाली आहे.

मृत विद्यार्थ्याचं नाव पंकज कुमार असून तो एक आठवड्यापासून बेपत्ता होता. गेल्या महिन्यात पंकजने जुना घरमालक मुन्ना यादवचं गिरधर एन्क्लेव्ह या इमारतीमधील घर भाड्यानं घेतलं होतं. परंतु या महिन्याच्या सुरूवातीला त्याने ते घर सोडलं. मुन्ना यादवचं घर सोडल्यानंतर तो बेपत्ता झाला. पंकज आयएमई महाविद्यालयात लॉच्या चौथ्या वर्षाला शिकत होता. ८ ऑक्टोबरला पंकज कुमार बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार साहिबाबाद पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

- Advertisement -

‘पकंज शेवटी ज्याठिकाणी दिसला तिथून आम्ही शोध सुरु केला. आम्हाला लक्षात आले की पंकजच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदविल्यापासन घरमालक मुन्ना यादव आपल्या परिवारासह गावी गेला होता.  आम्हाला ही गोष्ट संशयास्पद वाटली. आम्ही यादवच्या घराची तपासणी केली असता तळघरात नवीन बांधकाम दिसून आलं. आम्ही ते खोदलं असता त्याठिकाणी पंकजचा मृतदेह आढळून आला.’ – पोलीस अधीक्षक मनीष मिश्रा 

यादवच्या ४ मजली इमारतीमध्ये पहील्या मजल्यावर पंकज राहायचा. यादव त्याची पत्नी आणि चार मुलांसोबत दुसऱ्या मजल्यावर राहायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज यादवकडे १५ दिवस राहीला होता. त्यानंतर तो गिरधर एन्क्लेव्हमध्येच दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. पंकज मूळचा उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील होता, आपल्या गावी तो सायबर कॅफे चालवत असल्याची माहिती देखील यावेळी पोलिसांनी दिली.

- Advertisement -

‘पंकज घरमालक यादवच्या मुलांना शिकवणी द्यायचा. मुन्नाने त्याला त्याच्या भाड्याच्या घरातच राहण्याचा आग्रह केला होता, मात्र पंकजने नकार दिला. कदाचित याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद झाला असावा आणि म्हणून पंकजने दुसऱ्या जागी राहण्याचा निर्णय घेतला असावा.’ मनीष (पंकजचा भाऊ)

‘आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. पंकजच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीची किंवा काही वार झाल्याची कोणतीही जखम आढळून आली नाही. मात्र त्याच्या हत्येमागे काही वैयक्तिक कारण असावे असे दिसते. आम्ही घरमालक मुन्ना यादवचा शोध घेत आहोत’पोलीस अधीक्षक मनीष मिश्रा  

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -