घरCORONA UPDATEकोरोनामुळे कुणी हात लावेना; रस्त्यावर पडलेल्या व्यक्तिच्या मदतीला आली डॉ. आमदार

कोरोनामुळे कुणी हात लावेना; रस्त्यावर पडलेल्या व्यक्तिच्या मदतीला आली डॉ. आमदार

Subscribe

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे हल्ली माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. अशावेळेस जर कुणी अपघातात जखमी झाले तर त्याच्य मदतीलाही कुणी जात नाही. अशीच एक घटना आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्याजवळ एका महामार्गावर घडली. या महामार्गावर अपघातात एक व्यक्ति जखमी झाली होती, मात्र त्याच्या मदतीला सुरुवातील कुणीही आले नाही. मात्र त्या व्यक्तिची मदत आंध्र प्रदेशच्या एका महिला आमदाराने केली. विशेष म्हणजे या आमदार डॉक्टर आहेत. या घटनेचे फोटो आता आंध्रात सोशल मीडियावर व्हायरलत होत असून आमदार डॉ. श्रीदेवी यांचे कौतुक होत आहे.

झाले असे की, एक तरुण आपल्या मोटारसायकवर गुंटूरहून पिडुगुराला येथे जात होता. गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्याने एका लॉरीने त्याच्या मोटारसायकलला टक्कर दिली. या अपघातात तरुण चांगलाच जखमी झाला होता. बराच वेळ रस्त्यातच विव्हळत बसल्यावरही या तरुणाला कुणीही मदत केली नाही. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या तरुणाच्या जवळही जायला अनेक लोक घाबरत होते.

- Advertisement -

त्याचवेळेला आंध्र प्रदेशच्या सत्तारुढ पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या आमदार श्रीदेवी त्याच रस्त्याने आपल्या ताफ्यासहीत जात होत्या. त्यांनी रस्त्यावर जमलेली गर्दी आणि त्यामधोमध पडलेला जखमी तरुण पाहीला. त्यानंतर त्यांनी आपला ताफा थांबवून त्या तरुणाची मदत करण्याचे ठरविले. त्यांनी पोलिसांना फोन करुन तरुणाला रुग्णालयात नेण्याचा बंदोबस्त केला. तसेच रुग्णवाहिका येईपर्यंत आपल्या कौशल्याने त्यांनी तरुणाला प्रथोमपचारही दिला. पोलिसांची गाडी आल्यानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणानंतर डॉ. श्रीदेवी यांची प्रशंसा होत आहे. आंध्र प्रदेशच्या ताडीकोंडा विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार झालेल्या आहेत. श्रीदेवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही त्या तरुणाची मदत करत नव्हते. मी फक्त त्याला प्रथोमपचार दिले. हे करत असताना मी ग्लोव्ह्ज आणि मास्क घातला होता. कोरोनाच्या भीतीमुळे आपण लोकांची मदत करणे सोडायला नको, ही चांगली गोष्ट नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -