घरटेक-वेकमोबाईल नंबर पोर्टेबिलीटी ३१ मार्चपासून बंद?

मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी ३१ मार्चपासून बंद?

Subscribe

रिपोर्टनुसार, ३१ मार्च २०१९ नंतर नंबर पोर्टेबिलिटी सेवा बंद होणार असून, ग्राहकांना दुसऱ्या टेलिकॉम कंपनीची सेवा सुरु करायची असल्यास त्यांचा नंबर बदलावा लागणार आहे. 

इंटरनेट डेटाच्या भन्नाट ऑफर्स, खिशाला परवडणारे कॉलिंग प्लॅन्स तसंच अधिक चांगल्या नेटवर्कसाठी मोबाईलधारक त्यांचा मोबाईल नंबर एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ‘पोर्ट’ करुन घेतात. एका अहवालानुसार, पोर्टेबिलिटीची सेवा सुरु झाल्यापासून युझर्सचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही काळात भारतात पोर्टेबिललिटीचं प्रमाण अधिक वाढलं आहे. मात्र, युझर्सची पसंती मिळत असलेली ही पोर्टेबल सेवा (MNP) बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ‘पोर्टेबिलिटीची सेवा बंद झाली तर सर्वच टेलिकॉम कंपन्या दराच्या बाबतीत पुन्हा आपली मनमनी सुरु करतील, ज्याचा त्रास युझर्सना सहन करावा लागेल’, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार ३१ मार्च २०१९ नंतर नंबर पोर्टेबिलिटी सेवा बंद होणार असून, ग्राहकांना दुसऱ्या टेलिकॉम कंपनीची सेवा सुरु करायची असल्यास त्यांचा नंबर बदलावा लागणार आहे.

पोर्टेबिलिटी का होणार बंद?

रिपोर्टनुसार, मोबाईल नंबरच्या पोर्टेबिलिटीचं काम करणाऱ्या ‘एमएनपी इंटरकनेक्शन टेलीकॉम सोल्युश्न्स’ आणि ‘सिनिवर्स टेक्नोलॉजी’ या २ कंपन्या तोट्यात आहेत. याविषयी दोन्ही कंपन्यांनी गेल्याचवर्षी जुलै महिन्यात ‘टेलिकॉम विभागाला’ (DoT) याविषयी कळवले होते. या कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०१८ नंतर सातत्याने पोर्टिंग शुल्कामध्ये ८० टक्क्यांनी घट होत असल्यामुळे आम्हाला नुकसान सहन करावे लागत आहे. सूत्रांनुसार, मार्च २०१९ मध्ये या दोन्ही कंपन्यांच्या पोर्टेबिलीटी परवान्याचा कालावधी संपणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भविष्यात अधिक नुकसान सहन करण्याऐवजी या कंपन्या ‘पोर्टेबिलिटी’ ची सेवाच बंद करण्यात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

परवाने करणार परत

सूत्रांनुसार, दक्षिण आणि पूर्व भारतात नंबर पोर्टेबिलिटीचं काम पाहणाऱ्या एमएनपी इंंटरकनेक्शनच्या म्हणणयानुसार, मार्च अखेरीपर्यंत ते आपले परवाने परत करतील. ज्यानंतर पोर्टेबिलिटीचे कामही बंद केले जाईल. तर, उत्तर आणि पश्चिम भारतात पोर्टेबिलिटीचं काम करणाऱ्या सिनिवर्स टेक कंपनीला यामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे तेही आपला परवाना परत करतील. ‘ट्राय’ने (TRAI) एमएनपी शुल्कात घट करण्याचे आदेश दिल्यामुळे आम्हाला हे नुकसान सहन करावे लागल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. मार्च २०१८ पर्यंत दोन्ही कंपन्यांनी ३७ करोड नंबर्सची तर नोव्हेंबर २०१८ मध्ये ३२ करोड नंबर्सची पोर्टेबिलिटी केली आहे. मात्र, TRAI ने जानेवारी २०१८ मध्ये मोबाईल पोट्रेबिलिटीचे शुल्क १९ रुपयांवरुन कमी करुन थेट ४ रुपयांवर आणले होते. त्यामुळे कंपन्यांना पोर्टेबिलिटीच्या कामात नुकसान सहन करावं लागत असल्याची खंत कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोर्टेबिलिटी बंद होण्याच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास त्यामुळे मोबाईल युझर्सचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -