घरटेक-वेकशाओमीचा 'रेडमी नोट ७ प्रो'चा आज सेल

शाओमीचा ‘रेडमी नोट ७ प्रो’चा आज सेल

Subscribe

शाओमीचा 'रेडमी नोट ७ प्रो'चा आज पहिला सेल असून दुपारी १२ वाजल्यापासून हा सेल सुरु होणार आहे.

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड असलेल्या शाओमीचा रेडमी नोटच्या सिरीजमध्ये ‘रेडमी नोट ५ प्रो’ गेल्याच वर्षी बाजारात दाखल झाला. या फोनला भारतीय ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शाओमीचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला ‘रेडमी नोट ७ प्रो’चा आज पहिला सेल आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून हा सेल सुरु होणार आहे. तसेच या फोनची फ्लिपकार्ट आणि एमआय.कॉम आणि एमआय होमवर विक्री होणार आहे.

- Advertisement -

काही मिनिटातचं झाली विक्री

शाओमी ‘रेडमी नोट ७ प्रो’चा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला होता. मात्र या फोनला ग्राहकांनी इतकी पसंती दिली की, काही मिनिटाच्या आत हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला होता. शाओमीने या फोनच्या सेल आधी ८ एप्रिल रोजी ट्विटरवर एक प्रमोशनल करण्यासाठी एका व्हिडिओच्या माध्यमातून एक टीझर ग्राहकांसाठी उपलब्ध केला होता.

‘रेडमी नोट ७ प्रो’ ची वैशिष्ट्ये

६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले
कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन
क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० SoC प्रोसेसर
३ जीबी/४जीबी/६जीबी रॅममध्ये उपलब्ध
स्टोरेज: यात ३२ जीबी आणि ६४ जीबी असे दोन पर्याय
मायक्रो एसडी कार्ड वापरून याची स्टोरेज क्षमता वाढविता येईल
फोनच्या मागील बाजूस ड्युल कॅमरा सेटअप
मागील बाजूस ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा
सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा
३.३ एमएम ऑडियो जॅक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -