घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींकडून साध्वी प्रज्ञाची पाठराखण

पंतप्रधान मोदींकडून साध्वी प्रज्ञाची पाठराखण

Subscribe

साध्वीचा एटीएसने छळ केलाच नव्हता असा खुलासा मानवाधिकार आयोगानं केला आहे. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीला असे कुठलेही साक्ष पुरावे मिळाले नसल्याचे या समितीने 2015 मध्येच आपल्या अहवालात स्पष्ट केले होते.

मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य संशयित आणि भाजपाची लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुंबई हल्लयातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. मात्र हे साध्वींचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून भाजपाने हात झटकले आहेत, तर पंतप्रधान मोदींनी मात्र साध्वी प्रज्ञा यांच्याा उमेदवारीची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की ज्यांनी हिंदूंना अतिरेकी म्हटलेय, त्यांच्यासाठी साध्वीची उमेदवारी एक प्रतीक आहे. भोपाळमधून त्या कॉँग्रेसला चांगली टक्कर देतील असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलंय. अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवार जामिनावर आहेत, त्यांची चर्चा होत नाही. मात्र भोपाळमधील भाजपा उमेदवाराची चर्चा होते, असे सांगून त्यांनी कॉग्रेसला लक्ष्य केले.

- Advertisement -

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हुतात्मा हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझा छळ केला. ते देशद्रोही आहेत, धर्मविरोधी आणि कुटील आहेत. माझ्या शापानंतर सव्वा महिन्यातच त्यांना अतिरेक्यांनी संपवले या अर्थाचे वक्तव्य काल साध्वी यांनी केले होते. त्यानंतर देशभर साध्वी आणि भाजपाबद्दल संतापाची लाट उसळली, मात्र भाजपाने हे साध्वीचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून हात झटकले.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘हू किल्ड करकरे’?…हेमंत करकरेंच्या मृत्यूमागचे गंभीर मुद्दे!
                                –  साध्वी प्रज्ञा सिंहचे वक्तव्य नियोजनपूर्वक प्रचारतंत्र तर नव्हे?

तुरूंगात असतानासाध्वीचा एटीएसने छळ केलाच नव्हता असा खुलासा मानवाधिकार आयोगानं केला आहे. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीला असे कुठलेही साक्ष पुरावे मिळाले नसल्याचे या समितीने 2015 मध्येच आपल्या अहवालात स्पष्ट केले होते.

- Advertisement -

दरम्यान सगळ्या बाजूने टिकेची राळ उडाल्यानंतर आज अखेर जाहीर सभेत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या कालच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. भोपाळपासून 45 किमी अंतरावरील बैरसिया गावी त्या एका सभेत म्हणाल्या की भावूक झाल होते, तसेच रडतही होते. त्यामुळे माझ्या तोंडून जे निघाले, त्यासाठी मी क्षमा मागते. मात्र एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत देशाच्या शत्रूंना माझ्या वक्तव्यामुळे लाभ मिळेल, त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेते असेही म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर निशाना साधला.

कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी साध्वीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की हेमंत करकरे यांनी भारताचे रक्षण करताना आपले बलिदान दिले आहे, त्यांचा सन्मान राखायला हवा’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -