CoronaVirus: १० कोटी लोकांसाठी १.५ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज

New Delhi
Pm Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या वर्गाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. लोकांचे जीव वाचावेत म्हणून हा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले होते. आता हातावर पोट असलेल्या तब्बल १० कोटी जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकार तब्बल दीड लाख कोटींचे प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करु शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. इंडिया टु डे या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये आर्थिक पॅकेज देण्याची चर्चा सुरु असल्याची माहिती बाहेर आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस या आर्थिक पॅकेजबद्दल घोषणा होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. हे आर्थिक पॅकेज तब्बल २.३ लाख कोटींचे असू शकते असेही सांगितले जात आहे. देशातील १० कोटी गरीब जनतेच्या खात्यात थेट ही रक्कम जमा केली जाऊ शकते.

भारतात करोना बाधित रुग्णांचा आकडा ६०० च्या वर गेला आहे. तर ११ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळेच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन मोदींनी जाहीर केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here