‘चीन विरोधात लढण्यासाठी शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या युद्धनितीचा अवलंब करा’

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत हा सल्ला दिला.

Mumbai
shivaji maharaj maharana pratap guru govind singh

“चीनचा सीमावाद केवळ भारताबरोबरच नाही तर १८ देशांबरोबर आहेत. प्रत्येक ठिकाणी चीन कुरापत काढून भांडण करताना दिसतो. तरी भारतीय सैन्याने नेहमीच त्यांना कडवी झुंज दिली आहे. १९६२ ची आज स्थिती राहिली नाही. भारत आता खूप प्रगतशील आहे. त्यामुळे भारताने चीनला घाबरण्याचे कारण नाही. चीनदेखील काही बाबतीत कमजोर आहे, त्याचा फायदा घेत भारताने चीनला जेरीस आणले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंह यांच्या पराक्रमांचा आणि युद्धनीतीचा त्यानुसार अवलंब केला पाहिजे, असे विचार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत `हिंदुस्थान सीमावाद (१९६२ ते २०२० पर्यंत)’ या विषयावर ते बोलत होते.

भारत-चीन १९६२ च्या युद्धाची समीक्षा करणारा हँडरसन ब्रुक्स अहवाल जाहीर व्हावा, ही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची इच्छा होती. पण, त्यांच्या अचानक जाण्याने हे खाते सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांनीही तो प्रकाशित केला नाही. मात्र, आता हा अहवाल जाहीर करण्यासाठी जनतेनेच मोदी सरकारवर दबाव आणावा, अशी स्पष्ट भूमिका डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वातंत्र्यवीर ऑनलाइन व्याख्यानमालेतील फेसबुक लाईव्हदरम्यान केली.

“चीनच्या Apps वर बंदी घालण्याचे साहस भारत सरकारने केले. ही स्वागतार्ह बाब आहे. आता त्याचे अनुकरण इतर देश करू लागले आहेत. यामुळे नक्कीच चीनला धडा शिकवता येईल, अशा माध्यमातून चीनचे आर्थिक नुकसान होऊन तो वठणीवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“आम्हाला शेजारी राष्ट्र म्हणून चीनबरोबर चांगले संबंध हवेत. मात्र, तशी भूमिका चीनचीदेखील असायला हवी. यासाठी आपण देखील एक धोरण ठरवायला हवे. सध्या तरी चीनला आपल्या घुसलेल्या जागेतून खाली करायला हवे. त्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल ती मोजावी लागेल. आमच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंह यांनी जे केले, त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. केवळ त्यांच्याशी चर्चा, स्नेहभोजन करत बसले तर आपले नुकसान होईल. मोदी १८ वेळा चीनला गेले, नेहरूंनी हिंदी-चीनी भाई भाईचा नारा दिला, असे होता कामा नये. चीन कधीही आपला होणार नाही. त्यांच्या विरोधात आपली योजना असायला हवी, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.