घरदेश-विदेशअखेर मोदी सरकारमधल्या संभाव्य मंत्र्यांची नावं ठरली....

अखेर मोदी सरकारमधल्या संभाव्य मंत्र्यांची नावं ठरली….

Subscribe

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज हे खासदार घेऊ शकतात मंत्रीपदाची शपथ

गेल्या काही दिवसांपासून मोदी २.० अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंदीय मंत्रीमंडळात कोणाचा सहभाग असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही चर्चा जोरात सुरू असून प्रत्येकजण त्यावर तर्क वितर्क करण्यात व्यस्त आहे. काल दिल्लीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात बैठक होऊन ही नावे नक्की झाली आहेत. मात्र ती गुप्त राहतील अशी काळजी घेण्यात आली होती.

दरम्यान नरेंद्र मोदी बुधवारी सायंकाळी किंवा रात्री संभाव्य मंत्र्यांना फोन करून स्वत:च माहिती देतील असेही सांगितले जात होते. आज सकाळी ते आपल्या संभाव्य मंत्रीमंडळासोबत गुजरात भवनमध्ये चहापान करतील अशीही अटकळ होती. या सर्वांतून काही नावे समोर येत असून ही यादी नक्की झाल्याचे भाजपाच्या सूत्रांनी खात्रीशीरपणे सांगितले आहे.

- Advertisement -

 ही आहेत ती संभाव्य नावे

अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथसिंह, स्मृती इराणी, हरसिमरत कौर, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, मनेका गांधी, विनय सहस्त्रबुद्धे, रामदास आठवले, पीयुष गोयल, सुरेश प्रभू, अरविंद सावंत, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, जी किशन रेड्डी, मुख्तार अब्बास नक्वी, अर्जुन मेघवाल, बाबुल सुप्रियो यांचा समावेश आहे. आज हे संभाव्य मंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतच शपथ घेऊ शकतातमराठवाड्यातून यापूर्वीच्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री असलेले विद्यमान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहेविदर्भाला प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून खासदार संजय धोत्रे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता खात्रीशीरपणे वर्तविली जात आहेयाशिवाय दुसऱ्या यादीत आणखी काही जणांचा समावेश असून त्यात राज्यातील काही नावांचा समावेश होणार आहे. त्यातील एक जागा शिवसेनेला मिळणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -