आजचा दिवस मोदींसाठी ठरला होता खास

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच १६ मे २०१४ रोजी आजचा दिवस खास ठरला होता. कारण याच दिवशी मोदी लाट आली होती.

Delhi
modi wave was today five years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस खास ठरला होता. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच १६ मे २०१४ रोजी सोळाव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले होते. या निकालांमध्ये नरेंद्र मोदींचेया नेतृत्त्वाखाली भाजपाने विरोधकांचे आव्हान उद्धवस्त करुन केंद्रातील सत्ता हल्तगत केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल ३० वर्षांनंतर प्रथमच देशामध्ये स्पष्ट बहुमतासह सरकार बनले होते. या दिवशी मोदी लाट आली होती आणि विरोधक भुईसपाट झाले होते.

कोणाला मिळाल्या होत्या किती जागा

सोळाव्या लोकसभेसाठी ७ एप्रिल ते १२ मे २०१४ या दरम्यान नऊ टप्प्यात मतदान झाले होते. एकूण नऊ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेत सुमारे ६६.३८ टक्के लोकांनी मताधिकाराचा वापर केला होता. मतमोजणीमध्ये भाजपाला २८२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते. तर काँग्रेसची ४४ जागांवर घसरगुंडी उडाली होती. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला ५९ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसनंतर ३७ जागा जिंकून अण्णा द्रमुक हा तिसरा पक्ष बनला होता. तर तृणमूल काँग्रेसला ३४, बीजू जनता दलला २०, शिवसेनेला १८, तेलुगू देसम पक्षाला १६, तेलंगणा राष्ट्र समितीला ११ जागा मिळाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला ६, समाजवादी पक्षाला पाच तर आपला चार जागा मिळाल्या होत्या.

१९८० मध्ये स्थापना झालेल्या भारतीय जनता पक्षालाही प्रथमच केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले होते. १९८४ नंतर प्रथमच देशात कुठल्याही एका पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन झाले होते. तेव्हा सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारविरोधात असलेल्या वातावरणामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत होता. मात्र भाजापला स्वबळावर बहुमत मिळेल, असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र या विजयानंतर भाजपाने आक्रमक पवित्र्यासह देशात पक्षविस्ताराला सुरुवात केली होती. तर या निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३१.१ टक्के, काँग्रेसला १९.३ टक्के मते मिळाली होती. तर बसपाला ४.१ टक्के, तृणमूल काँग्रेसला ३.८ टक्के, समाजवादी पक्षाला ३.४ टक्के, अण्णा द्रमुकला ३.३ टक्के, सीपीआय एमला ३.३ टक्के तर इतर पक्षांना ३१.८ टक्के मते मिळाली होती.


वाचा – ‘बिग बींचे ‘ते’ ट्विट मोदींविरोधात तर नाही?’

वाचा – संपादकीय : गनिमी नव्हे; ‘मोदी’ कावा!