घरदेश-विदेशमोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव ऑनलाइन पोर्टलवर!

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव ऑनलाइन पोर्टलवर!

Subscribe

लिलावातून मिळणारे पैसे केंद्र सरकारच्या गंगा सफाई योजनासाठी देण्यात येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेट स्वरूपातील वस्तूंचा लिलाव होणार असून मोदींच्या वस्तू सर्वसामान्यामांना विकत घेता येणार आहे. मोदींना संपुर्ण देशभरातून २७०० पेक्षा अधिक वस्तू भेट स्वरूपात मिळाल्या आहेत. याच वस्तूंचा येत्या १४ सप्टेंबरला लिलाव होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली आहे.

या लिलावात नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात मिळालेल्या २ हजार ७७२ भेटवस्तूंमध्ये पगडी, शाल, चित्रं, तलवारी यांचा समावेश आहे. या सर्व वस्तू पंतप्रधानांना विविध संघटना तसेच मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आहेत. या वस्तूंचा लिलाव ऑनलाइन पोर्टलवर केला जाणार असून नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटरनं ते डिझाइन केले आहे. या लिलावात विक्री होणाऱ्या वस्तूंची किंमत २०० रूपयांपासून २.५० लाखांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

लिलावातून मिळणारे पैसे केंद्र सरकारच्या गंगा सफाई योजनासाठी…

जानेवारीमध्ये पंतप्रधानांना मिळालेल्या १८०० भेटवस्तूंचा लिलाव सुरू होता, तो लिलाव १५ दिवस सुरू होता. या वस्तू घेण्यासाठी साधारण ४ हजार लोकांनी आपला सहभाग दर्शवला होता. या लिलावातून मिळालेले पैसे केंद्र सरकारच्या गंगा सफाई योजना – नमामी गंगेसाठी देण्यात आले होते.

२०१५ साली झालेल्या लिलावातील महागडा सूट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूटचा २०१५ मध्ये लिलाव झाला होता. तो ४.३१ कोटींना विकण्यात आला होता. सूरतमधील एका हिरा व्यापाऱ्याने तो खरेदी केला असून त्याचे नाव लालजी पटेल असे होते. त्याने हा सूट विकत घेतला होता. त्यावेळीही ४५० पेक्षा जास्त वस्तू लिलावामध्ये ठेवल्या होत्या. त्यापैकी सर्वात महागडा तो सूट होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -