घरताज्या घडामोडीMohammad Paigambar Cartoon : सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणांविरोधात FIR दाखल!

Mohammad Paigambar Cartoon : सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणांविरोधात FIR दाखल!

Subscribe

फ्रान्समध्ये एका शिक्षिकेने शाळेमध्ये मोहम्मद पैगंबर यांचं कार्टून दाखवल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद जगभरातल्या मुस्लीम देशांमध्ये उमटत असताना ते भारतात देखील काही प्रमाणात दिसू लागले आहेत. यासंदर्भात सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. लखनौच्या हजरतगंज पोलीस स्थानका हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासाठी द्वेष पसरवणे, अशांती पसरवणे आणि आयटी अॅक्टची कलमं लावण्यात आली आहेत. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील मुनव्वर राणांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, तुरुंगात टाकायचं असेल तर टाका, असं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

फ्रान्समध्ये हा प्रकार घडल्यानंतर मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून वादंग निर्माण केला होता. ज्या शिक्षिकेने मोहम्मद पैगंबर यांचं कार्टून दाखवलं होतं, त्या शिक्षिकेची जाहीर हत्या करण्यात आली होती. या हल्लेखोराला नंतर फ्रान्स पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये कंठस्नान घातलं होतं. मात्र, त्यावर बोलताना मुनव्वर राणा यांनी शिक्षिकेच्या हत्येचं अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचं सांगितलं जात आहे. ‘हल्ला करणाऱ्याच्या जागी मी असतो, तर मीही हेच केलं असतं. एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये की तो हत्या करण्यासाठी तयार व्हावा. मोहम्मद साहेबांचं कार्टून बनवून हल्लेखोराला हत्या करण्यासाठी भाग पाडलं गेलं. जर कुणी भगवान राम यांचं कार्टून बनवलं, तर मी त्याची देखील हत्या करेन’, असं मुनव्वर राणा म्हणाले होते.

- Advertisement -

दरम्यान, मुनव्वर राणा यांच्यावर FIR दाखल झाल्यानंतर देखील त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. ‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी दल बदलणारा नाही. ज्यानं कार्टून बनवलं, त्यानं चुकीचं केलं. पण ज्यानं हत्या केली, त्यानं त्याहून चुकीचं केलं’, असं देखील ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -