घरदेश-विदेशतांदळाच्या वेफर्सपासून बनवली 'मोनालिसा'

तांदळाच्या वेफर्सपासून बनवली ‘मोनालिसा’

Subscribe

ही अनोखी कलाकृती साकारण्यासाठी तब्बल २०० स्थानिकांनी एकूण २४ तासांची मेहनत घेतली. ७ वर्षाच्या लहानग्यांपासून ते ७० वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच यामध्ये सहभाग घेतला होता.

‘मोनालिसा’ या जगप्रसिद्ध कलाकृतीविषयी आपण सर्वच जाणतो. लिओनार्डो द विंची या जखविख्यात कलाकाराने साकारलेली बिन भुवयांची सुंदर महिला म्हणजेच मोनालिसा. आजवर मोनालिसाच्या असंख्य प्रतिकृती किंवा चित्रं जगभरात साकारण्यात आली आहेत. मात्र, जपानमध्ये नुकतीच एक आगळीवेगळी कलाकृती साकारण्यात आली आहे. तांदुळाच्या तब्बल २४ हजार चिप्सपासून मोनालिसाचेएक भव्य चित्रं जपानमध्ये तयार करण्यात आलं आहे. या प्रतिकृतीची लांबी १३ मीटर तर रुंदी ९ मीटर इतकी आहे. विशेष म्हणजे मोनालिसाच्या या अनोख्या प्रतिकृतीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. जपानमधील ‘सोका गक्कई’ या धार्मिक उत्सवानिमित्त या खास प्रतिकृतीची निर्मीती करण्यात आल्याचं समजतंय. सोशल मीडियावर सध्या याचा एक फोटो व्हायरल होत असून, वेफर्सपासून बनवलेल्या या हटके कलाकृतीचं जगभरातून कौतुक होत आहे.


वाचा: विमान कंपनीचा ‘मेगा सेल’, ९९९ रुपयांत तिकीट

एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, एकूण २४ तासांच्या कालावधीमध्ये तब्बल २०० स्थानिकांनी ही अनोखी प्रतिकृती साकारली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये ७ वर्षाच्या लहानग्यापासून ते ७० वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला होता. या प्रतिकृतीसाठी ७ वेगवेगळ्या रंगाचे वेफर्स वापरण्यात आले आहेत. याशिवाय त्या वेफर्सना हायलाईट करण्यासाठी सोया सॉस, साखर आणि ग्रीन टीचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान या अनोख्या कलाकृतीची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यानंतर, यामध्ये वापरलेले तांदळाचे सगळे वेफर्स लोकांना खाण्यासाठी वाटण्यात आले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -