संसद परिसरात माकडांचा उच्छाद

सध्या माकडांच्या टोळ्यांनी संसद परिसरात उच्छाद मांडला असल्याने माकडांशी नजर भिडवू नका असे अनोखे फर्मान सचिवालयाने काढले आहे.

Delhi
Rajya Sabha passes Bill reservation for economically backward
आर्थिक मागास आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर

संसद परिसरात माकडांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच हिवाळी अधिवेशन तोंडावर आले असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या माकडांशी नजर भिडवू नका असे अनोखे फर्मान लोकसभा सचिवायल्याने काढले आहे. त्याचप्रमाणे माकड रस्त्यात समोर आले तर रस्ता देखील ओलांडू नका असा इशारा देखील सचिवायल्याने केला आहे.
सध्या माकडांच्या टोळ्यांनी संसद परिसरात उच्छाद मांडला असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रपती भवन, नॉर्थ, साउथ ब्लॉक आणि संसद भवन तसेच आजूबाजूच्या परिसरातील माकडांच्या टोळ्या धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. त्यातच हिवाळी अधिवेशन तोंडावर आल्याने माकडांचा बंदोबस्त कसा करावा ही चिंता सचिवालयाला सतावत आहे.

अंदाजे ४० हजार माकडांची दहशत

सध्या माकडांच्या उच्छादाने दिल्लीकर हैराण झाले आहेत. ही माकडे घरात घुसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. ही माकड घरात घुसून खाणयाचे पदार्थ पळवत आहेत. तसेच मंगळवारी आणि शनिवारी दिल्लीकर माकडांना भोजन देतात त्यामुळे ही माकडे शेफारल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकृत माहितीमुसार या ठिकाणी अंदाजे ४० हजार माकडे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र राजधानीत किती माकडे आहेत याचा अधिकृत आकडा वन विभागाकडेही उपलब्ध नाही.

सचिवालयाचे अनोखे फर्मान

लोकसभा सचिवालयाने चक्क एक अनोखे फर्मान काढले आहे. त्यात त्यांनी माकडांशी नजर भिडू नका अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच माकड तुमच्या गाडीसमोर आली तरी घाबरु नका. तसेच माकडांनी खो – खो केले तरी त्याकडे दुर्लक्ष करा. असा सल्लाही सचिवालयाने केला आहे. तसेच माकड खूपच त्रास देत असल्यास काठी जमिनीवर काठी आपटा, असे देखील सचिवालयाने सांगितले आहे.


वाचा – संसदेवर हल्ल्याच्या तयारीमध्ये खलिस्तानी दहशतवादी