LAC वरील चीनच्या घुसखोरीवर काँग्रेसने मांडला स्थगन प्रस्ताव

monsoon session of parliament

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, अधिवेश सुरु होताच पूर्व लडाखमध्ये चीनने केलेल्या अतिक्रमणावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि के.सुरेश यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.

विरोधी पक्ष कोरोना, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि लडाखमध्ये सीमेवर चिनी अतिक्रमण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशनाला सुरुवात होताच काँग्रेसने पूर्व लडाखमध्ये चीनने केलेल्या अतिक्रमणावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. यासह दिल्ली दंगलीच्या प्रकरणात सीताराम येचुरी यांचं नाव आल्या प्रकरणी सीपीएम पक्षनेते मुद्दा उपस्थित करीत आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या दंगलीच्या आरोपपत्रात सीपीएमचे खासदार ए. एम. आरिफ यांनी सीताराम येचुरी यांचं नाव आल्यामुळे स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.