अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा हाहाकार! एका दिवसात तब्बल २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा हाहाकार! एका दिवसात तब्बल २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

जगात शक्तीशाली महासत्ता म्हणून मिरविणार्‍या अमेरिकेत कोरोना व्हायरसची नव्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत २ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ५ लाख ९ हजार १८४वर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेनुसार, अमेरिकेत आतापर्यंत २ लाख ४५ हजार ७९९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ६६ लाख १ हजार ३३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अमेरिकेतील ३७ लाख १२ हजार ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहे, यामधील १९ हजार ३७४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

चिंतेची बाब अशी आहे की, अमेरिका येणारे थंडीचे वातावरण आणि सुट्या यासाठी तयार नाही आहे. याकाळात कोरोना प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. द गार्डियन लेखानुसार, जेव्हा सुट्यांचा काळ असेल तेव्हा सर्व कुटुंब मोठ मोठे दौरे करतील आणि अशावेळी कोरोनाच्या नियमाचे पालन केले जाणार आहे. उन युनिव्हर्सिटीचे संशोधक मेगन राने म्हणाले की, आता आम्ही महामारीच्या सर्वात वाईट काळात जात आहोत. देशाचे भवितव्य पुढीच्या दोन महिन्यांवर अवलंबून आहे.’

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ कोटी १८ लाख ५ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ७९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ६३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, जाणार जेलमध्ये!