पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये

सर्वाधिक कमी मतदान बिहारमधील चार जागांवर ५३.४७ टक्के झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काही नक्षलग्रस्त भागातून अद्याप १७ मतदान पथक परत आले नाहीत.

Mumbai
Election

गुरूवारी लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. ११ एप्रिलला झालेल्या या मतदानात ६९.४३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. १८ राज्ये,२ केंद्रशासित प्रदेश अशा ९१ जागांसाठी मतदान पार पडले. राज्यांमध्ये सर्वाधिक ८३.७९ टक्के मतदान पश्चिम बंगालच्या दोन जागांवर झालं आहे. तर सर्वाधिक कमी मतदान बिहारमधील चार जागांवर ५३.४७ टक्के झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काही नक्षलग्रस्त भागातून अद्याप १७ मतदान पथक परत आले नसल्यामुळे या आकडेवारीत काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

तर केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये ८४.९६ टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत सर्व ९ टप्प्यांमध्ये एकूण ६६.४४ टक्के मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये लक्षद्वीप आणि बंगाल पुढे आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश (७८.१४ टक्के), अरुणाचर प्रदेश (६७.०८), आसाम (७८.२३), बिहार (५३.४७), छत्तीसगड (६५.८०), जम्मू-काश्मीर (५७.३५), महाराष्ट्र (६३.०४), मणिपूर (८२.८२), मेघालय (७१.४१), मिझोराम (६३.०२), नागालँड (८३.१२), ओडिशा (७३.७६), सिक्किम (७८.१९), तेलंगाणा (६२.६९), त्रिपुरा (८३.२६), उत्तराखंड (५९.८९), प. बंगाल (८३.७९), अंदमान-निकोबार (६४.८५) आणि लक्षद्वीप (८४.९६) मतदान झाले.

पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडून २४ तासांहून अधिक वेळ झाला आहे. मात्र छत्तीसगड आणि ओडिशातील नक्षल प्रभावित भागातून मतदान पथके अद्याप परतलेले नाहीत. आंध्र प्रदेशातील दोन मतदारसंघात एकाच वेळी मतदान पार पडले. २०० पेक्षा अधिक केंद्रांवर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मतदान सुरु होते. गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानांत पुरुषांनी केलेल्या मतदानांचे प्रमाण ७२.१२ टक्के तर महिलांचे ७१.९३ टक्के इतक आहे. तर तृतीयपंथीयांच्या मतदानाची टक्केवारी १७.९४ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here