घरCORONA UPDATEबिहारनंतर मध्य प्रदेशमध्येही कोरोना लस मोफत देण्याची भाजपची घोषणा

बिहारनंतर मध्य प्रदेशमध्येही कोरोना लस मोफत देण्याची भाजपची घोषणा

Subscribe

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये बिहारच्या जनतेला मोफत कोरोना लस दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. ट्विट करुन चौहान यांनी ही माहिती दिली. जेव्हा कोरोनाची लस येईल, तेव्हा मध्य प्रदेशच्या जनतेला तिचे मोफत वाटप करण्यात येईल, असे चौहान म्हणाले आहेत.

- Advertisement -

शिवराज सिंग चौहान ट्विटमध्ये म्हणतात की, “राज्यातील जनतेला कोविड पासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने प्रभावी पाऊले उचलली आहेत. त्यामुळेच आजपर्यंत कोरोना नियंत्रणात राहिला. भारतात कोरोनाची लस तयार करण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. जशी लस तयार होईल, तशी मध्य प्रदेशमधील प्रत्येक नागरिकाला ती मोफत उपलब्ध करुन दिली जाईल.”

याआधी देखील शिवराज सिंग चौहान यांनी मोफत कोरोना लस देण्यासंदर्भात भाष्य केले होते. ग्वाल्हेरच्या पोटनिवडणुकीदरम्यान भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना चौहान यांनी कोरोना लस आल्यानंतर ती मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र नंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना लस फक्त गरिब लोकांना देण्यात येईल, असे सांगितले होते.

- Advertisement -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी देखील कोरोनाची लस आल्यानंतर ती मोफत वाटण्याची घोषणा केली आहे. आजच (गुरुवारी) पलानीस्वामी यांनी ही घोषणा केली आहे. तामिळनाडूचे दुसरे मंत्री डी. जयकुमार म्हणाले की, लसीसाठी जो काही खर्च होईल, तो राज्य सरकार उचलेल. आमची प्राथमिकता लोकांना आरोग्य आणि सुरक्षा पुरविण्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -