आणि ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांनी केलं किस

पालिका रुग्णालयात एका डॉक्टरने नर्सला किस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी संबधित डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे.

Ujjain
doctor
प्रातिनिधिक फोटो

डॉक्टर हा देवाचे दुसरे रुप असतो असे म्हणतात. मात्र उत्तर प्रदेशात डॉक्टरांचे एक वेगळेच चित्र समोर आले आहे. उत्तर प्रदेश येथील उज्जैन येथील प्रशासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये एका नर्सला किस केल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले आहे. या किसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी जेवणाची वेळ झाली म्हणून एका महिलेची प्रसूती करण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता. डॉक्टरांच्या या चित्रांनतर आता डॉक्टरांकडे कोणत्या आशेने बघावे? असा प्रश्न रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय कुटुंबियांना पडला आहे.

“सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी केलेले हे कृत्य योग्य नाही. यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलीन होऊ शकते. संबधित डॉक्टरला त्याच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या जागी दुसऱ्या डॉक्टरची नेमणूक करण्यात आली आहे. डॉक्टरांनी असे काही करण्यापूर्वी आपल्या पदाबद्दल नक्की विचार करावा.”- उज्जैन जिल्हाधिकारी शशांक मिश्रा 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here