सावित्रीबाई फुलेंनी का सोडले भाजप

२३ डिसेंबरला लखनऊ येथील रमाबाई मैदानात महारॅलीचे आयोजन केले आहे. या महारॅलीमध्ये मी मोठी घोषणा करणार असल्याचे सावित्रीबाई फुले यांनी सांगितले.

Delhi
savitribai phule
सावित्रीबाई फुले

भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपच्या लखनऊतील बहराइच मतदार संघाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सावित्रीबाई फुले यांनी भाजपच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली होती. भाजपवर गेल्या काही दिवसापासून त्या सातत्याने टीका करत आल्या आहेत. भाजपला राजीनामा देताना देखील त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला केला आहे. त्यानी आरोप केला आहे की, भाजप समाजामध्ये फूट पाडण्याचा कट रचत आहे. तसंच भाजप सरकार दलित विरोधी आहे. मी दलित खासदार असल्यामुळे माझे मताकडे दुर्लक्ष केले जायचे. मोदी सरकारचे धोरण हे दलितविरोधी असल्याचा आरोप दावा त्यांनी केला आहे.

संविधानाला संपवण्याचा प्रयत्न सुरु

खासदार सावित्रीबाई फुले यांनी असे म्हटले आहे की, भाजप सरकार संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. दलितांचे आरक्षण मोठ्या शिताफीने आरक्षण समाप्त करत आहेत. जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत घरी परत जाणार नाही. संविधानाला पूर्णपणे लागू करणार आहे. २३ डिसेंबरला लखनऊ येथील रमाबाई मैदानात महारॅलीचे आयोजन केले आहे. या महारॅलीमध्ये मी मोठी घोषणा करणार असल्याचे सावित्रीबाई फुले यांनी सांगितले.

हनुमान मनुवादी लोकांचे गुलाम होते

गेल्या काही दिवसापासून हनुमानाच्या जातीवरुन राजकारण सुरु आहे. त्या विषयावर त्यांनी वक्तव्य केले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यान यांच्या दाव्याचे समर्थन करत त्यांनी हनुमान दलित असल्याचे म्हटले होते. हनुमान दलित असून ते मनुवादी लोकांचे गुलाम होते असे देखील खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते. सावित्रीबाई फुले यांनी मंगळवारी हे वक्तव्य केले होते. त्यांनी असे म्हटले होते की, दलित आणि मागासवर्गियांना वानर आणि राक्षस असे संबोधले जायचे. हनुमान हे मुनष्यप्राणी होते. त्यांनी आयुष्यभर रामाची सेवा केली. तरीही त्याच्या पाठीला शेपूट जोडून चेहरा विचित्र करुन वानर ठरविण्यात आले. दलित असल्याने हनुमान यांना आयुष्यभर अपमान सहन करावा लागला. दलितांना माणूस समजण्यात येत नाही त्याचे हनुमान प्रतीक असल्याचे मत सावित्रीबाई फुले यांनी व्यक्त केले आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here