महेंद्रसिंह धोनी क्रिकेट खेळत नाही, पण ‘हे’ करतोय!

Ranchi
mahendra singh dhoni

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि विकेट कीपर महेंद्रसिंह धोनी २०१९ साली झालेल्या वर्ल्डकपनंतर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी त्यासंदर्भात सूचक वक्तव्य देखील केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताचा हा सर्वोत्तम फिनीशर टीम इंडियाकडून कधी क्रिकेट खेळताना दिसेल? याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तसेच, २०२०मध्ये होणाऱ्या २०-२० वर्ल्डकपमध्ये देखील माही खेळेल की नाही? याविषयी साशंकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माही पुन्हा चर्चेत आला आहे. पण तो त्याच्या खेळण्याच्या बातमीमुळे नसून दुसऱ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे.

धोनी सध्या क्रिकेटमधून घेतलेल्या या ब्रेकमध्ये त्याचे छंद जोपासण्याची संधी साधतोय. यासाठीच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक वाघाचा फोटो शेअर केला आहे. धोनीने नुकतीच कान्हा व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्याने त्याच्या फोटोग्राफीचा छंद जोपासत तिथल्या वाघांचे भरपूर फोटो काढले आहेत. त्यातलाच एक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर टाकला आहे. त्याखाली, ‘ तुम्हाला वाघ दिसतो आणि तो तुम्हाला निवांतपणे फोटो देखील काढू देतो. कान्हा फॉरेस्टला दिलेली भेट धम्माल ठरली’, असं त्याने फोटोला कॅप्शन दिलं आहे.

विश्वचषक २०१९मध्ये सेमीफायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडविरोधात झाला होता. त्यामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी धोनी रनआऊट झाला होता. त्यामुळे भारताच्या सेमीफायनलचा सामना जिंकण्याच्या आणि अंतिम फेरीत जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. त्या दिवसापासून धोनीने एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल २०२०मध्ये धोनी पुनरागमन करेल, असं म्हटलं जात आहे.


Viral Video: धोनीच्या हातची पाणी पुरी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here