घरदेश-विदेशमुफ्ती, अब्दुलांना देश तोडू देणार नाही

मुफ्ती, अब्दुलांना देश तोडू देणार नाही

Subscribe

मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबियांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांनी काश्मीरचे प्रचंड शोषण केले आहे. त्यांना देश तोडायचा आहे. मात्र मी त्यांना देश तोडू देणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जम्मूतील कठुआ येथे एका रॅलीत मोदी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये पहिली प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. अब्दुल्ला, मुफ्ती कुटुंबियांनी कितीही प्रयत्न केले तरी मी या देशाचे तुकडे होऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सला जितके प्रयत्न करायचे आहेत तितके प्रयत्न त्यांनी करवले. मला जितक्या शिव्या द्यायच्या आहेत त्यांनी द्याव्यात; पण हा मोदी त्यांना घाबरणार नाही, वाकणारही नाही की कधी विकला जाणार नाही, असे मोदी म्हणाले.

काश्मीरमध्ये सीमेजवळ राहणार्‍या नागरिकांना आम्ही आरक्षण दिले आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक , एअर स्ट्राइकचा संपूर्ण देशाला अभिमान आहे; पण या हल्ल्यांमुळे विरोधकांच्या पोटात इतके का दुखते आहे? त्यांना नक्की कोणाचे समर्थन मिळते, असा सवाल करत काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काही घेणे-देणे नाही. भारतीय सैन्य त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग होता. सुरक्षा करारांमधून फक्त पैसे लाटण्याचे काम त्यांनी केले’ अशी जोरदार टीका मोदी यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -