घरट्रेंडिंगमोदींच्या ऐतिहासिक विजयदिनी मुस्लिम कुटुंबात बाळाचा जन्म; नाव ठेवले 'नरेंद्र मोदी'

मोदींच्या ऐतिहासिक विजयदिनी मुस्लिम कुटुंबात बाळाचा जन्म; नाव ठेवले ‘नरेंद्र मोदी’

Subscribe

लखनऊमधील एका मातेच्या हट्टापायी कुटुंबियाने निवडणुकीच्या निकालीदिवशी जन्मलेल्या बाळाचे नाव नरेंद्र मोदी ठेवलं आहे. २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निर्णय भाजपाच्या बाजूने लागला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी चर्चेत आले. त्यामुळे या मातेनेही आपल्या बाळाचं नाव नरेंद्र मोदी ठेवावं असा हट्ट आपल्या कुटुंबाकडे केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा प्रभाव आजही लोकांमध्ये कायम आहे. याचाच परिणाम लखनऊ मधील एका कुटुंबावर ही झाल्याचा दिसतो. २३ मे ला उत्तर प्रदेशमध्ये एका मुस्लिम कुटुंबात मुलाचा जन्म झाला. याचदिवशी नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने त्या कुटुंबाने मुलाचे नावच नरेंद्र मोदी असं ठेवलं आहे.

मोहम्मद इदरीश आणि मैनाज बेगम या दाम्पत्याला निकालाच्या दिवशी पुत्रप्राप्ती झाली. यावरुन मुलाचं नाव काय ठेवायचं यावर चर्चा सुरू झाली. मुलाची आई मैनाज बेगम हिने मुलाचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा हट्ट केला. दुबईत राहणाऱ्या पतीनेही फोनवरुन मैनाज यांना समजावलं पण, मैनाजने बाळाचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा हट्ट कायम ठेवला. अखेर कुटुंबियांनी बाळाचं नरेंद्र मोदी नाव ठेवण्यास परवानगी दिली. कुटुंबियांनी बाळाच्या नावाच्या नोंदणीसाठी पंचायत कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाकडे अर्ज केला आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी देशासाठी चांगलं काम करत असून आतापर्यंत त्यांनी अनेक उपाययोजना आणल्या आहेत. त्यांचा फायदा गोरगरीब लोकांना होत असल्याचं बेगम सांगतात. तसंच, तिहेरी तलाक संदर्भात कायदा करुन मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं म्हणत बेगम यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -