मुस्लिम भगवान रामाचे वशंज; भाजप मंत्री पुन्हा बरळले

Agra
union minister giriraj singh
केंद्रीय लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री गिरीराज सिंह

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले केंद्रीय लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री गिरीराज सिंह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. “मुस्लिम हे बाबरचे नाही तर रामाचे वशंज असून त्यांनी राम मंदिर उभारण्यासाठी मदत करावी”, असे वक्तव्य केले आहे. जर मुस्लिम समुदायाने राम मंदिर बांधण्यास मदत केली नाही तर माझ्याएवढा दुःखी कोणी होणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. मथुरा येथे एका कार्यक्रमानिमित्त गिरीराज सिंह आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

लोकसंख्या वाढीला ‘तो’ समुदाय जबाबदार

गिरीराज सिंह पुढे म्हणाले की, भारतात एका समुदायामुळे लोकसंख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे देशाचा विकास खुटंत असून काही लोकांनी आपली लोकसंख्या वाढवण्याचा निर्धारच केला आहे. मात्र हिंदु लोक दोन मुलांपेक्षा जास्त मुले होऊ देत नाहीत. ग्रामीण भागातही हिंदु दांम्पत्य हे प्रमाण अबाधित ठेवून आहे. मात्र भारतातील एक समुदाय कुटुंब नियोजन करण्यासाठी तयारच नसल्याचे गिरीराज सिंह म्हणाले.

गिरीराज सिंह पुढे म्हणाले की, “आम्हाला विश्वास आहे की आमची बाजू भक्कम आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखतो. शिया बंधून राम मंदिर बांधण्यास सहमती दर्शवली आहे. आता इतर मुस्लिम बांधवानी देखील पुढाकार घेऊन राम मंदिर बांधण्यासाठी मदत करावी कारण आपण सर्वच हिंदूचे वशंज आहोत.”

राहुल गांधी यांनी बिफ खाने बंद करावे

गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. ते म्हणाले की, राहुल गांधी जर खरे हिंदु असतील तर त्यांनी आधी पार्ट्यांमधून बीफ खाने बंद करावे आणि निवडणुकांच्या आधी मंदिरात जाणे थांबवावे. राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका करताना गिरीराज म्हणाले की, “ते स्वतःची शिव भक्त म्हणून प्रतिमा बनवत आहेत. तरी त्यांना ते शक्य होणार नाही कारण लांडग्याने वाघाचे कातडे परिधान केले तरी तो वाघ बनत नाही तर लांडगाच राहतो.”