घरदेश-विदेशफान्समध्ये मुस्लीमांकडून मोदींचे स्वागत, पाकिस्तानच्या जिव्हारी

फान्समध्ये मुस्लीमांकडून मोदींचे स्वागत, पाकिस्तानच्या जिव्हारी

Subscribe

भारताच्या पंतप्रधानांचे मुस्लीम समाजाने केलेले हे स्वागत पाकिस्तानला पचले नाही

फ्रांन्स दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुस्लीम समुदायाकडून तिरंगा हाती घेऊन स्वागत करण्यात आले. मोदींच्या या स्वागतामुळे पाकिस्तान कमालीचा अस्वस्थ झाला असून पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी या स्वागताला ड्रामा म्हंटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौ-यावर असून गुरूवारी पॅरिस विमानतळावर गुजरातमधील दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींचे तिरंगा फडकवत स्वागत केले. यावेळी भारतीयांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला. मात्र भारताच्या पंतप्रधानांचे मुस्लीम समाजाने केलेले हे स्वागत पाकिस्तानला पचले नाही.

- Advertisement -

भारत सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार करणाऱ्या पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट करुन आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये फ्रान्समधील भारतीय मुस्लीम मोदींशी हस्तांदोलन करुन त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. त्यापैकी एका व्यक्तीने मोदींना तिरंगा झेंडा घेऊन त्यांचे स्वागत केल्याचेही व्हिडिओत दिसते.

पाकिस्तानात अस्वस्थता

इम्रान खान यांच्या सरकारमध्ये माहिती मंत्री असणाऱ्या फवाद चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ रिट्विट करताना कोट करुन ‘या नाटकासाठी किती पैसे खर्च केले ?’ असे ट्विट केले आहे. भारत मुस्लीम विरोधी असल्याचा कांगावा करणा-या पाकिस्तानला मोदींच्या फ्रांन्समध्ये झालेल्या स्वागतामुळे चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे पाकिस्तानात अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -