घरदेश-विदेशमुज्जफरपूर बालिका गृह प्रकरण: फरार मंत्री मंजू वर्माची शरणागती

मुज्जफरपूर बालिका गृह प्रकरण: फरार मंत्री मंजू वर्माची शरणागती

Subscribe

मंजू वर्मा यांच्यावर आरोप लागल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दोषी नसल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर त्या फरार झाल्या. पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती सुरु केल्यावर त्यांच्या घरात त्यांना मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा सापडला होता.

बिहारच्या मुजफ्फरपूर येथील बालिका गृहातील दोषी आणि माजी मंत्री मंजू वर्मा या फरार होत्या. आज मंजू वर्मा या शरण आल्या आहेत. बेगुनसराय जिल्ह्यातील मंझौल न्यायालयात त्यांनी शरणागती पत्करली. मुज्जफरपूरमधील बालिका गृहातील गैरप्रकारांमध्ये त्यांच्या पतीचा हात असल्याचे कळले होते. या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी सामाजिक न्यायमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. आज बुरका घालून त्यांनी शरणागती पत्करली.

संपत्तीच्या भितीने शरणागती

बालिका गृहातील आरोपी असलेल्या माजी सामाजिक न्याय मंत्री मंजू वर्मा यांच्या बेगूनसराय येथील घराबाहेर संपत्ती जप्त करण्याची नोटीस लावली होती. हे आदेश मंझौल न्यायालयाने दिले होते. ही नोटिस देण्याआधी बिहार पोलिसांनी देखील त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. पण त्यांनी आत्मसमर्पण न केल्यामुळे त्यांना नोटिस पाठवण्यात आली. सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारल्यानंतर पोलिसांनी मंजू वर्माच्या तपासाला जलदगतीने सुरुवात करुन संपत्ती जप्तीची नोटिस पाठवली.

- Advertisement -
वाचा हे नेमकं प्रकरण काय?

छाप्यात सापडली स्फोटके

मंजू वर्मा यांच्यावर आरोप लागल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना दोषी नसल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर त्या फरार झाल्या. पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती सुरु केल्यावर त्यांच्या घरात त्यांना मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा सापडला होता. पण त्या दरम्यानच त्या फरार झाल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे बालिका गृहातील मुलांवर लैंगिक शोषण करण्याबरोबरच त्यांच्या घरातील स्फोटके कशासाठी आणण्यात आली होती याचा तपास आता सीबीआई करत आहे.

नेमकं प्रकरण काय? 

बिहारमधील मुजफ्फरपूरमधील बालिका गृहातील अल्पवयीन मुलींना झोपेचे औषध देऊन बलात्कार केले जायचे. शिवाय विरोध केल्यास मारहाण देखील केली जायची. विशेष म्हणजे या आजुबाजूला राहणाऱ्या लोकांनाही येथील मुलींवर होणारा अत्याचार समजू शकला नाही. एकूण ३४ मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचे सिद्ध झाले होते.

- Advertisement -
वाचा का दिला मंजू शर्मा यांनी राजीनामा

आणखी एक धक्कादायक खुलासा 

पोलीस तपासात आणखी काही गोष्टी आल्या असून या प्रकरणात मधू नावाच्या एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. ही महिला येथील मुलींना सेक्स कसे करायचे या संबंधीचे शिक्षण देत होती. ही महिला देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. सध्या ती ताब्यात असून तिची कसू चौकशी केली जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -