माझ्या पाकिस्तान जाण्याने भारत-पाक संबध मजबूत – सिद्धू

Ajmer
My Pakistan visit is the sign of good relationship between India and Pak says navjot singh sidhu
नवज्योत सिंग सिंद्धू

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इम्रान खान यांच्या शपथविधीला भारतामधून भारताचे माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानला गेले होते. सिद्धू यांच्या शपथविधीला गेल्यामुळे वाद निर्माण झाला होता. सिद्धू यांच्यावर यामुळे मोठ्या प्रमाणात टिका झाली. तसेच काँग्रेसने सिद्धू यांच्या भेटीचे समर्थनही केले. सिद्धू यांनी यावर आता पून्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. भेटीला जाण्यापूर्वी सिद्धू म्हणाले होते की, माझ्या पाकिस्तानला जाण्याने उभय देशांमधील संबध सुधारतील. आणी आता सिद्धू म्हणताय की, दोन्ही देशांमधील संबध सुधारण्याची अपेक्षा आणखी मजबूत झाली आहे.

का म्हणाले सिद्धू?
राजस्थानच्या अजमेर येथे आयोजित कार्यक्रमात सिद्धू म्हणाले की, ”माझ्या मित्राकडून (इम्रान खान) मला एक संदेश आला आहे. त्यामध्ये माझा मित्र म्हणतो की, आम्ही दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उत्सुक आहोत. तुम्ही या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे, आता ते (पाकिस्तान) दोन पाऊलं पुढे टाकणार”. तसेच सिद्धू म्हणाले की, ‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानहून परतले त्यानंतर कारगिलचे युद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानहून परतल्यानंतर पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला. परंतु मी पाकिस्तानवरुन परतल्यानंतर भारतात झालेल्या विविध वादांमुळे माझ्या मित्राने (इम्रान खान) मला सांगितलं की आम्हाला शांती हवी आहे. यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकले, तर आता आम्ही दोन पाऊले पुढे टाकू.

फोटो सौजन्य – India Today