घरदेश-विदेशट्रम्प म्हणतात, माझा मुलगा १५ मिनिटांत कोरोनामुक्त झाला

ट्रम्प म्हणतात, माझा मुलगा १५ मिनिटांत कोरोनामुक्त झाला

Subscribe

कोरोना होणं म्हणजे देवाज आशीर्वाद, असं अजब विधान करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक चकित करणारं विधान केलं आहे. माझा मुलगा १५ मिनिटांत कोरोनामुक्त झाला, असा अजब दावा ट्रम्प यांनी केला आहे. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. मात्र, थोड्याफार प्रमाणात प्रभावी ठरलेली औषधं कोरोना रुग्णांना दिली जात आहे. रुग्णांना किमान १५ दिवस उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या विधानाने सर्वजण चकित झाले आहेत.

अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ट्रम्प यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. एका रॅलीमध्ये बोलताना ट्रम्प यांनी त्यांच्या १४ वर्षांचा मुलगा बेरॉन ट्रम्पच्या (Barron Trump) कोरोनाबाबतची माहिती दिली. पेन्सिलव्हेनियातील मार्टिन्सबर्ग इथे बोलताना, डॉक्टरांना मी बेरॉनच्या कोरोना चाचणीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी मला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. १५ मिनिटांनी पुन्हा त्याच्या तब्येतीबाबत विचारलं तेव्हा डॉक्टरांनी तो कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं. मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याचा कोरोना १५ मिनिटांत पळाला. त्यानंतर त्याने आपल्यासमोर शाळेत जायची इच्छाही व्यक्त केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

- Advertisement -

ट्रम्प शाळा सुरु करण्याच्या विचारात

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत शाळा सुरु करायच्या आहेत. परंतु अनेक राज्य ट्रम्प यांच्या निर्णयाशी सहमत नाही आहेत. राज्यांनी मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच ट्रम्प निवडणूक प्रचारातून शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रचारांमध्ये मुलाचं उदाहरण देत मुलगा कसा कोरोनातून बरा झाला याबाबत सांगत आहेत. कोरोनातून किती लवकर बरा झाला त्यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही हे ते दाखवून देत आहेत.


हेही वाचा – भारताची नाही तर अमेरिकेचीच हवा घाणेरडी; ट्रम्प हा रिपोर्ट वाचाच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -