घरदेश-विदेशसमुद्र किनाऱ्यावर दिसले रहस्यमय प्राण्यांचे मृतावशेष!

समुद्र किनाऱ्यावर दिसले रहस्यमय प्राण्यांचे मृतावशेष!

Subscribe

रहस्यमय प्राण्याचे मृतदेह ब्रिटनमधील एका किनाऱ्यावर दिसले

बर्‍याच वेळा समुद्राच्या किनाऱ्यावर जनावरं, प्राणी मृत आवस्थेत पडलेले दिसतात. परंतु अशा रहस्यमय प्राण्याचे मृतदेह ब्रिटनमधील एका किनाऱ्यावर दिसले की तेथील लोकं बघून घाबरले, आश्चर्याची बाब म्हणजे या मृतदेहातून खूप दुर्गंध येत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, लिव्हरपूल इकोच्या वृत्तानुसार, ब्रिटिश समुद्रकिनार्‍यावर १५ फूट रहस्यमय प्राण्याचे अवशेष दिसू लागले. पहिल्यांदा २९ जुलै रोजी एका व्यक्तीला किनाऱ्यावर हे मृत अवशेष दिसून आले.

- Advertisement -

अहवालानुसार, त्या व्यक्तीने असे सांगितले की, त्याचे चार पाय होते, ते फार विचित्र दिसत होते. हे विचित्र अवशेष सुमारे १५ फूट लांब होते आणि सर्वत्र हाडे दिसत होती. त्या व्यक्तीने असे म्हटले की, असे दिसते की तो एका रहस्यमय प्राण्याला जन्म देत आहे आणि त्याच वेळी त्याचा मृत्यू झाला असावा. या प्राण्याचे फोटो एंसडेल यांनी शेअर केले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

द सनच्या एका वृत्तानुसार, नॅचरल इंग्लंडचे वरिष्ठ सल्लागार स्टीफन आयलिफ यांनी या संदर्भात असे सांगितले की, या जीवाची ओळख पटवता येत नाही. ते असेही म्हणाले की, त्या प्राण्याचे शरीर वाईट रीतीने सडलेले आहे आणि चिखलाने भिजलेले असल्याने तो जीव नक्की कोणता आहे हे ओळखणं कठीण झाले आहे.  दरम्यान या समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांनी हे दृश्य पाहिले त्यावेळी प्रचंड घाबरले असल्याचे सांगितले जात आहे.


Photo: लाखो दिव्यांच्या रोषणाईने लखलखली रामनगरी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -