घरदेश-विदेशनिशांत अग्रवालला तीन दिवसांची ट्रांजिट रिमांड

निशांत अग्रवालला तीन दिवसांची ट्रांजिट रिमांड

Subscribe

ब्राह्मोस मिसाइलची गुप्त माहिती फोडणाऱ्या संशयित आयएसआय एजंट निशांत अग्रवालला नागपूर सेशन कोर्टाने तीन दिवसांच्या ट्रांजिट रिमांडमध्ये पाठवले आहे. रिमांड संपल्यानंतर त्याला उत्तरप्रदेश एटीएसच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

ब्राह्मोस मिसाइलची गुप्त माहिती फोडणाऱ्या संशयित आयएसआय एजंट निशांत अग्रवालला आज नागपूर सेशन कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने निशांत अग्रवालला तीन दिवसाची ट्रांजिट रिमांडमध्ये पाठवले आहे. रिमांडनंतर निशांतला उत्तरप्रदेश एटीएसच्या ताब्यात दिले जाणार असून तिथे त्याची पुढची चौकशी केली जाईल. निशांतला सोमवारी अटक करण्यात आली. निशांतवर आरोप करण्यात आला आहे की, त्याने ब्राह्मोस मिसाइलसंबंधित महत्वपूर्ण आणि गोपनिय माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला दिली आहे. याचे पुरावे एटीएसला सापडल्याने त्यांनी त्याला अटक केली.

आयएसआयचा एजंट असल्याची शक्यता

नागपूरमधील डिफेन्स रिसर्च आणि रिसर्च ऑर्गनायिझेशनचा वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. निशांत ब्रह्मोस एयरोस्पेस सेंटरमध्ये काम करतो. ब्रह्मोससंदर्भात महत्वाची आणि संवेदनशील माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला दिल्याचा आरोप निशांतवर आहे. तसंच तो आयएसआय या दहशतवादी संघटनेचा एजंट असल्याचे देखील सांगितले जात आहे. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त अभियान करुन निशांत अग्रवालला अटक केली.

- Advertisement -

सोमवारी सकाळी नागपूरातून अटक

रविवार रात्रीपासून दहशतवादी विरोधी पथक निशांत अग्रवालवर लक्ष ठेवून होते. सोमवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. निशांत गेल्या ४ वर्षापासून डीआरडीओच्या नागपूर यूनिटमध्ये काम कर होता. ब्रह्मोस एयरोस्पेस भारताचे संरक्षण संशोधन व विकास संघटना आणि रशियाच्या एनपीओएमचा संयुक्त उपक्रम आहे. गेल्या वर्षीच ब्रह्मोस एयरोस्पेसवर शस्त्र प्रणालीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर परीक्षण करण्यात आले होते. ब्रह्मोस जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रुझ मिसाइल आहे.

भारत आणि रशियाचा एकत्रित उपक्रम

ब्रह्मोस मिसाइलला पानबुडीतून, जहाजातून तसंच विमानातूने देखील सोडले जाऊ शकते. हे मिसाइल कमी उंचीवर वेगात उड्डाण घेऊ शकतो. तसंच ही मिसाइल भूमिगत परमाणु बंकरो, कमान अॅण्ड कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरुन उडणाऱ्या विमानांना लांबूनच निशाणा बनवू शकते. भारत आणि रशियानं एकत्रितपणे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मस्कवा या नद्यांच्या नावांवरून या क्षेपणास्त्राला ब्राह्मोस हे नाव देण्यात आलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -