राजघाटवर मानवंदना देऊन नायडूंनी केली उपोषणाला सुरुवात

आंध्र प्रदेशला विभक्त राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आज राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू हे आज दिल्लीमध्ये उपोषणाला बसणार आहेत.

Mumbai
chandrababu naidu
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशला विभक्त राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आज, सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू हे आज दिल्लीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. केंद्र सरकारविरोधात करण्यात येणाऱ्या या आंदोलनाची सुरुवात त्यांनी आज सकाळी राजघाटवर पुष्पांजली वाहून केली. तेलगू देशम पार्टी (टीडीपी) यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच राज्य पुनर्गठन अधिनियम, २०१४ नुसार दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीकरता आज दिल्लीमध्ये एकदिवसिय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण सुरु करण्यापूर्वी त्यांनी राजघाटवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

वाचा – चंद्राबाबू नायडूंनी सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला – मोदी

वाचा – ‘मोदी गो बॅक’, आंध्रात जोरदार नारेबाजी!

एकदिवसिय लाक्षणिक उपोषण

राज्याच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशला दिलेल्या सापत्न वागणुकीनंतर टीडीपीने गेल्यावर्षी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या विशेष दर्जेसाठी मुख्यमंत्री आग्रही राहिले असून आज ते दिल्लीतील आंध्र भवन येथे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. तर १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनही सादर करणार आहेत. नायडू यांच्यासोबत पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर राज्य कर्मचारी संघ, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनेचे लोकं यामध्ये असणार आहेत.

वाचा – काँग्रेससाठी संरक्षण क्षेत्र कमाईचे साधन – मोदी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here