राहुल गांधींच्या केबिनवर प्रियंका गांधींचे नाव

राहूल गांधी यांच्या केबिनच्या शेजारी प्रियंका गांधी यांना केबिन मिळाली असून या केबिनला नेमप्लेट सुध्दा लावण्यात आली आहे.

Delhi
Nameplate of Priyanka Gandhi Vadra
प्रियंका गांधी वाड्रा यांची नेमप्लेट

प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसच्या सरचिटणीस पद आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून कार्यभार स्विकरण्यासाठी जोरदार तायरी सुरु आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी दिल्लीतील २४ अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात प्रियंका गांधींना केबिन मिळाली. राहूल गांधी यांच्या केबिनच्या शेजारी त्यांना केबिन मिळाली असून या केबिनला नेमप्लेट सुध्दा लावण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, ज्यावेळी राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस होते त्यावेळी ते याच केबिनमध्ये बसत होते.

नेत्यांच्या बैठका सुरु

सोमवारी प्रियंका गांधी भारतात आल्या त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुगलग रोड येथे असणाऱ्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. काँग्रेसने गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राज्याचे प्रभारी आणि महासचिव यांची बैठक बोलावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी देखील या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीची समिक्षा देण्यासाठी शनिवारी सर्व राज्यांच्या काँग्रेस अध्यक्ष आणि विधानसभेच्या नेत्यांची बैठक बोलावली होती.

प्रियंका गांधींसमोर मोठे आव्हान

उत्तरप्रदेशच्या ८० जागांपैकी ३३ जागा प्रियंका गांधी पाहणार आहे. मोदींची सीट वाराणसी, योगी आदित्यनाथ यांची सीट गोरखपूर, मुलायम सिंह यांची सीट आजमगढ आहेत. या सर्व जागा प्रियंका गांधींच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. २००९ मध्ये काँग्रेसची पूर्वांचलमध्ये १५ जागा आणि उत्तरप्रदेशमध्ये २२ जागा होत्या. २००९ मध्ये काँग्रेसला १९ टक्के मत मिळाले होते. तर २०१४ मध्ये कमी होऊन त्याचा आकडा ९ टक्केवर आला आणि त्यांना फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता.

काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रभारी बनवल्यानंतर दोघांनी देखील त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला नाही. ज्याठिकाणी त्यांना प्रभारी बनवण्यात आले आहेत त्याठिकाणचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ज्याठिकाणी ते प्रभारी म्हणून काम करणार आहेत. त्या भागामध्ये भाजपचे दिग्गज चेहरे खासदार राहिले आहेत. भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याच मतदार संघात येतात. त्यामुळे या मतदार संघात प्रियंका गांधींना स्वत:चे वर्चस्व कायम ठेवण्यात आव्हानात्मक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here