घरदेश-विदेशनंदकुमार साय म्हणाले, हनुमान दलित होते

नंदकुमार साय म्हणाले, हनुमान दलित होते

Subscribe

अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान हे दलित नाही तर अधिवासी होते असे विधान केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत हनुमान हे दलित आदिवासी होते असे वादग्रस्त विधान केले होते.त्यावर साय यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत हनुमान हे दलित आदिवासी होते असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान हे दलित नाही तर अधिवासी होते असे विधान केले आहे. दरम्यान या विधानावरुन योगी यांना ब्राह्मण सभेने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर साय यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हनुमान यांच्या जातीचा विषय आणखी वादाच्या भोवऱ्यात पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ब्राह्मण सभेची योगी आदित्यनाथांना नोटीस

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले नंदकुमार साय?

नंदकुमार साय म्हणाले की, ‘अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असतं. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये गिग्गा नावाचे गोत्र असते. या गिग्गाचा अर्थ वानर असा होतो. अनूसुचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्र आहेत’. यापुढे साय सांगतात की, श्रीराम ज्या सैन्याच्या साहाय्याने युद्ध केले, त्या सैन्यामध्ये बहुतांश सैनिक हे अनुसूचित जातीचे होते. त्यामुळे हनुमान दलित नव्हे तर आदिवासी होते, असे साय म्हणाले.

हेही वाचा – महानगरचा दणका; हनुमान गल्लीतील वेश्याव्यवसाय बंद!

- Advertisement -

हनुमानांविषयी योगी असे का म्हणाले?

राजस्थानच्या अलवरमध्ये दलित आदिवासी समाज जास्त आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित आदिवासी होते असे म्हटले होते. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, भगवान हनुमान हे दलित आदिवासी आणि वनवासी होते. बजरंगबलींनी भारतीय समाजाला पुर्वेपासून पाश्चिम आणि उत्तरेपासून दक्षिणपर्यंतच्या जोडण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. भारतीय समाजाला एकत्र जोडण्याची इच्छा ही प्रभू रामचंद्रांची होती. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्याचे काम बजरंगबलींनी केले, आपणही ही इच्छा पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसता कामा नये. त्याचबरोबर योगी यांनी भगवान हनुमानच्या जातीच्या मतदारांना भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे आणि रावणभक्तांनी कॉंग्रेसला मतदान करावे, असे योगी आदित्यनाथ म्हटले होते.


हेही वाचा – योगी सरकारची दिवाळी ‘गिनीज’ बुकात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -