घरदेश-विदेशराहूल गांधींच्या त्या ट्वीटवर मोदींनी अशी दिली प्रतिक्रिया !

राहूल गांधींच्या त्या ट्वीटवर मोदींनी अशी दिली प्रतिक्रिया !

Subscribe

आज उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात केली.  त्यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवला. यावेळी मोदींनी विरोधपक्षांवर बोलण्याची एकही संधी सोडली नाही. ए-सॅट म्हणजे काहींना रंगभूमीचा सेट वाटला असं म्हणत त्यांनी राहूल गांधींची खिल्ली उडवली.

जे लोक गेल्या 70 वर्षांत सर्वसामान्य गरिबांचे साधे बँक खाते उघडू शकले नाहीत ते गरीबांच्या बँका खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.  त्याचप्रमाणे गेल्या चार दशकांपासून आमचे जवान वन रँक वन पेन्शनची मागणी करत होते. त्यांचा मागणी पूर्ण करण्याचे काम या चौकीदाराने केलं आहे. देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना 75 हजार कोटी रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य देण्याचे कामही आमच्या सरकारने केले आहे.”असे मोदीं सभेला संबोधीत करताना म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान काल उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रसारणाद्वारे जाहीर केली. मात्र ही कृती म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी केलेला आटापिटा असल्याची तक्रार विरोधी पक्षांनी केली होती. त्याच दरम्यान राहुल गांधी यांनी टविट केले होते. त्यात म्हटले होते की ही चाचणी यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन, तर पंतप्रधान मोदीजींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. आज याच टविटचा समाचार पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पहिल्या प्रचारसभेच्या भाषणात घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -