पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती, राहुल गांधी की नरेंद्र मोदी?

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना ४६ टक्के लोकांनी तर राहुल गांधींना ३२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. PSE अर्थात पॉलिटीकल स्टॉक एक्सचेंजनं केलेल्या सर्व्हेची ही आकडेवारी आहे.

Delhi
Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल

पंतप्रधानपदासाठी कुणाला पसंती? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? जनतेचा कौल कुणाला? राहुल गांधी की नरेंद्र मोदींना? यासारखे प्रश्न तुम्हाला नक्की पडले असतील नाही का? त्यासाठी आता देशभर सर्व्हे देखील केले जात आहेत. नुकताच PSE अर्थात पॉलिटीकल स्टॉक एक्सचेंजनं सर्व्हे केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधी यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. नरेंद्र मोदी यांना ४६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर राहुल गांधी यांना ३२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर २२ टक्के लोकांनी माहित नाही असं उत्तर दिलं आहे. २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये २ लाख १६ हजार २३५ लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदींच्या पारड्यातच लोकांनी आपली मतं टाकली आहेत. पण, दक्षिण भारतात मात्र राहुल गांधींना पसंती मिळाली आहे. या सर्व्हेमध्ये महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगारीच्या मुद्यावर देखील प्रश्न विचारण्यात आले होते.

लोकसभेची रणधुमाळी

लोकसभा २०१९ची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप – प्रत्यारोपांना देखील आता जोर चढला आहे. भाजपनं देखील सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर विरोधकांनी एकत्र येत भाजपला सत्तेतून खाली खेचू असा दावा केला आहे. त्यासाठी विरोधकांच्या एकीची हाक दिली गेली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधानपदासाठी सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर असले तरी राहुल गांधींना देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे.