घरदेश-विदेशपीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती

Subscribe

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शानावरचे ग्रहण काही दूर होताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. उद्या, ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता याच्या प्रदर्शनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेल्या या चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय याने प्रमुख भूमिका साकारली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट नर्मात्याने चित्रपट प्रदर्शनाच्या नव्य तारखेची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टने पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करण्यास नकार दिला. चीफ जस्टिट रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने सांगितले की, पीएन नरेंद्र मोदी या चित्रपटाला आम्ही पाहिले नाही. आम्ही या चित्रपटाला पाहू त्यानंतर यावर निकाल देऊ. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -

पीएम नरेंद्र मोदी याच्या चित्रपटावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी करणाऱ्या वकिलांच्या बेंचने सांगितले की, यावर नियमित क्रमाने सुनावणी केली जावी. त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक संपेपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. याचिकेत आरोप लावला आहे की, ‘प्रेक्षक आणि मतदारांचे मन बदलण्यासाठी आणि त्यांना प्रभावित करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटामध्ये मोदींची भूमिका साखारलेला अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी ट्विट करत चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख असून येत्या ११ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचसोबत विवेकने न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटावर विरोध होत असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकण्यात येत आहे. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, पुढचे आदेश येईपर्यंत प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. मध्यप्रदेश हायकोर्टच्या इंदौर खंडपीठाने बुधवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी ही याचिका फेटाळी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -