घरदेश-विदेशकाश्मीरचा प्रश्न आम्ही द्विपक्षीय चर्चेतून सोडवू; मोदींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

काश्मीरचा प्रश्न आम्ही द्विपक्षीय चर्चेतून सोडवू; मोदींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

Subscribe

काश्मीरचा प्रश्न आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चेतून सोडवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

काश्मीर मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करुन काश्मीर मुद्दा सोडेल, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच वक्तव्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील द्विपक्षीय मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही आपसात चर्चा करुन प्रश्न सोडवू’, असे उत्तर मोदींनी दिले आहे. फ्रान्समध्ये जी-७ परिषद भरवण्यात आली. या परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक झाली. या बैठकीदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ‘काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील आपसातील मुद्दा आहे. त्यामुळे द्विपक्षीय बैठकीतून ते प्रश्न सोडवू शकतील’, अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिका दौरा केला. पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत बंद केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानात आर्थिक मंदीचे प्रचंड मोठे संकट आले. त्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अमेरिकेने पुन्हा सुरु करावी, अशी मागणी घेऊन इम्रान खान अमेरिकेत गेले. मात्र, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका काश्मीर मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करेल, असे म्हटले होते. त्यामुळे मोठ्या चर्चांना उधान आले होते. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ताबडतोब स्पष्टीकरण दिले होते. काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील असून द्विपक्षीय बैठकीतून सूटेल. यामध्ये अमेरिका मध्यस्थी करणार नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले. याशिवाय भारतच्या परराष्ट्र मंत्रालयानेही असेच स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, आज जी-७ परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला आपसातला प्रश्न असून द्विपक्षीय बैठकीतून यावर तोडगा निघेल, असे स्पष्टपणे सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प यांची मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -