निकालानंतर मोदींनी घेतली ‘या’ दिग्गज नेत्यांची भेट

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली.

New Delhi
Narendra modi meet Lal Krishna Advani and Murli Manohar Joshi
निकालानंतर मोदींनी घेतली 'या' दिग्गज नेत्यांची भेट

सतराव्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे भेट घेत आहेत. आज सकाळी मोदी आणि अमित शहा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.


या ट्विटर पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच ‘लालकृष्ण आडवाणी यांच्यामुळेच भाजपची प्रगती झाली. त्यांनी काही दशके पक्षासाठी झोकून देऊन प्रेरणा दिली’, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


आज सकाळी मोदी यांनी मुरली मनोहर जोशी यांची देखील भेट घेतली. या भेटीबाबत देखील मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती टाकली आहे.