सुप्रिया सुळेंनी सांगितले, मुलायमसिंहच्या मोदी कौतुकाचे खरे कारण

नरेंद्र मोदी हे येत्या निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधान बनणार अशी ईच्छा समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.

New Delhi
Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधान यांच्यासंबधी इच्छ व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरवरून मुलायमसिंह यांच्यावर टीका केली आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वीही मुलायमसिंह यांनी असेच वक्तव्य माजीपंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या बाबतीत केले होते, असे त्या म्हणाल्या आहेत.

काय आहे प्रकरण

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मुलायमसिंह यांनी मोदींचे समर्थन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. मुलायमसिंह यांनी म्हटले की,”आगामी निवडणुकीत सदनातील सर्व सदस्य पुन्हा निवडून येवोत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होवोत.” यावेळी सभागृहातील सदस्यांमध्ये हास्याची लकेर उमटली. मुलायमसिंह यांनी नरेंद्र मोदींनाही हसतहसत अभिवादन केले.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशात युती करून मोदी सरकारविरोधात जोरदार आघाडी उघडली असताना मुलायमसिंह यांनी असे वक्तव्य का केले हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सभागृहाला संबोधित केल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here