Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर देश-विदेश नरेंद्र मोदी ३० मे रोजी दुसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी ३० मे रोजी दुसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

New Delhi
Swearing in ceremony of NDA government
पंतप्रधान मोदी यांची टीका

लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये सर्वाधिक ३०३ जागांवर विजय मिळवून नरेंद्र मोदी यांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यानंतर आता ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवन येथे संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना गोपनियतेची शपथ देतील. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असेल? याची उत्सुकता असली तरी अद्याप कोणाचीही नावे जाहीर झालेली नाहीत. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण इतर देशातील प्रमुखांना सुद्धा देण्यात येणार आहे.

भाजपने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत २८२ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यापेक्षा पुढे जात ३०३ जागांवर विजय प्राप्त केला आहे. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखादा बिगर काँग्रेसी पक्ष सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमतासहीत सरकार स्थापन करत आहे.