घरदेश-विदेशगरिबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन - मोदी सरकारचा निर्णय

गरिबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन – मोदी सरकारचा निर्णय

Subscribe

मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासदायक निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याच्या निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारने २०१९ लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने गरिबांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस कनेक्शन) देण्याच्या निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला एलपीजी कनेक्शन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेची २०१६ मध्ये सुरुवात झाली होती.

उज्ज्वला योजना

आर्थिक बाबींबद्दलच्या कॅबिनेट समितीने सोमवारी उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. यामुळे आतापर्यंत ज्या गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळालं नव्हतं किंवा जे याच्यासाठी पात्र नव्हते अशा सगळ्यांना याचा लाभ होईल असं प्रधान म्हणाले. आतापर्यंत २०११ च्या सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणनेनुसार एलपीजी कनेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर अनुसुचित जाती, मागासलेला समाज आणि पंतप्रधान आवास योजना आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता यामध्ये सर्व गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे १०० टक्के कुटुंबापर्यंत एलपीजी कनेक्शन पोहोचेल असा ही विश्वास प्रधान यांनी दिला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार तेल कंपन्यांना १६०० रुपये सबसिडी देत आहे. ही सबसिडी गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी दिली जात आहे.

- Advertisement -

वाचा – मोदी सरकार करणार ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -